हैदराबाद - आंध्र प्रदेश हायकोर्टाने स्पष्ट केले आहे, की वेश्यालयात गेलेला ग्राहक फक्त ग्राहक आहे. त्यामुळे त्यांच्यावर खटला चालवला जाणार नाही. असे स्पष्ट मत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने एका खटल्याचा निकाल देताना नोदंवले आहे.
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात एका याचिकाकर्त्याने सीआरपीसीच्या कलम 482 अंतर्गत फौजदारी याचिका दाखल करून त्याच्यावरील फौजदारी कारवाई रद्द करण्याची मागणी केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी याचिकाकर्त्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि तपासानंतर दोषारोपपत्र दाखल केले, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.
याचिकाकर्त्यावर आरोप आहे की, पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकला तेव्हा त्यांना याचिकाकर्ता ग्राहक म्हणून आढळला. वेश्याव्यवसायाचा क्लायंट कोणत्याही गुन्ह्यासाठी खटला चालवण्यास जबाबदार नाही त्यामुळे याचिकाकर्त्याविरुद्धची कारवाई खटल्यातील तथ्ये आणि परिस्थितीत चालू ठेवण्यासाठी न्यायालयाच्या प्रक्रियेचा गैरवापर होईल, त्यामुळे त्याच्यावरील कारवाई रद्द करण्यात यावी असही त्यामध्ये म्हटले आहे.
हेही वाचा - देश भर में मनाया जा रहा ईद-उल-फितर : राष्ट्रपति कोविंद, पीएम मोदी ने दी बधाई