ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशात कोरोनाच्या कप्पा व्हेरियंटने रुग्णाचा मृत्यू - कोरोना का कप्पा वैरिएंट

मेहदावल येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीला बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. अति ताप असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या स्वॅब तपासणीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या रुग्णाचा १४ जूनला मृत्यू झाला.

कप्पा व्हेरियंट
कप्पा व्हेरियंट
author img

By

Published : Jul 9, 2021, 5:24 PM IST

लखनौ- उत्तर प्रदेशमधील संत कबीर जिल्ह्यातील मेहदावल येथे ६५ वर्षीय व्यक्तीचा कप्पा या कोरोनाच्या व्हेरियंटमुळे मृत्यू झाला आहे. कप्पा व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांची तपासणी करण्यात आली आहे. अद्याप, त्यांच्यामध्ये कप्पा व्हेरियंटची लागण झालेली नाही.

मेहदावल येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीला बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. अति ताप असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या स्वॅब तपासणीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या रुग्णाचा १४ जूनला मृत्यू झाला.

हेही वाचा-ZIKA VIRUS आणखी १४ जणांना केरळमध्ये लागण

नातेवाईकाच्या माहितीनुसार रुग्णाला मेहदावल येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. २७ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह चाचणी आली होती. मृताचा मुलगा अनुराग सिंह याने सांगितले, की २८ मे रोजी वडिलांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे १४ दिवस उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नव्हती. मुख्य वैद्यकीय अधिकारी इंद्र विजय विश्वकर्मा म्हणाले, की माध्यमातील माहितीतून रुग्णाला कप्पा कोरोना व्हेरियंटमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे कळाले आहे. त्याबाबत तपास सुरू आहे.

हेही वाचा-NEW PRIVACY POLICY अंमलबजावणीकरता व्हॉट्सअपचे पुन्हा एक पाऊल मागे

असे मिळाले काप्पा व्हेरियंट नाव

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतात सर्वात पहिल्यांदा मिळालेल्या कोरोना स्ट्रेनचे नामकरण केले आहे. बी.1.617.1 आणि बी.1.617.2 या दोन स्ट्रेन्सना अनुक्रमे 'काप्पा' आणि 'डेल्टा' अशी नावे देण्यात आली आहेत. या नावांसाठी यूनानी लिपीतील अक्षरांची मदत घेतल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले होते. डब्ल्यूएचओच्या कोविड-१९ टेक्निकल प्रमुख डॉ. मारिया वान केरखोव यांनी ट्विट करत याबाबत सांगितले होते. या स्ट्रेन्सना सहजपणे ओळखता यावे यासाठी ही नावे ठेवण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली होती. तर, या स्ट्रेन्सच्या वैज्ञानिक नावांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

डब्ल्यूएचओने सांगितले, की या विषाणूच्या विविध स्ट्रेन्सबाबत चर्चा करताना वा माहिती देताना मदत व्हावी यासाठी त्यांची नावे ठेवली जातात. यासाठी अल्फा, बीटा, गॅमा अशा यूनानी लिपीतील अक्षरांची मदत घेण्यात येते. असे केल्यामुळे सामान्य लोकांनाही विषाणूच्या स्ट्रेन्समध्ये फरक करणे सोप्पे जाते. त्यामुळे, त्यांना याबाबत माहिती मिळवताना कोणतीही अडचण येत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.