कोझिकोड : 'देने वाला जभी देता देता छप्पर फाडके' हे गाणे तुम्हाला आठवतेय का? हे विचारण्याचे कारण म्हणजे तिरुवनंतपुरम मधील कोझिकोड गावातील एका व्यक्तीला हाच अनुभव आला आहे. या व्यक्तीला विशू बंपर लॉटरी लागली असून यातून त्यांनी 12 कोटी रुपये जिंकले आहेत.
नाव ठेवले गुपित : केरळ लॉटरी विभागाच्या अटी आणि नियमानुसार विशू लॉटरीतून 12 कोटीतून या व्यक्तीच्या हातात 7.56 कोटी रुपये आले आहेत. लॉटरीचा पैसा घेताना त्या व्यक्तीने केरळ लॉटरी विभागासमोर अट ठेवली की, त्याचे नाव आणि पत्ता किंवा इतरत माहिती कुठेच जाहीर करू नये. त्यामुळे लॉटरी विभागाने त्याचे नाव जाहीर केले नाही. VE 475588 क्रमांकाच्या तिकिटाला विष्णू बंपर लॉटरी ड्रॉमध्ये 12 कोटींचे पहिले बक्षीस मिळाले आहे.
असे आहे बक्षीस : मलप्पुरम जिल्ह्यातील तिरूर येथील M 5087 एजन्सीच्या आदर्श नावाच्या एजंटने विकलेल्या तिकिटाला प्रथम पारितोषिक मिळाले. प्रथम पारितोषिक विजेत्यास 10% एजन्सी कमिशन आणि 30% इतर कर वगळून बक्षिसातील अंतिम रकमेचा 40% भाग प्राप्त झाला. दुसरे बक्षीस सहा जणांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे आहे. VA 513003, VB 678985, VC 743934, VD 175757, VE 797565 आणि VG 642218 क्रमांकाची तिकिटे द्वितीय पारितोषिकासाठी पात्र आहेत. तर तिसरे बक्षीस 6 जणांना मिळाले आहे. तिसऱ्या बक्षिसांची रक्कम 10 लाख रुपये आहे.
तीन ते पाच नंबरचे व्यक्ती झाले लाखपती : या सहा लोकांना प्रत्येकी 10 लाख रुपये मिळाले आहेत.VA 214064, VB 770679, VC 584088, VD 265117, VE 244099 आणि VG 412997 क्रमांक असलेली तिकिटांना तृतीय पारितोषिक मिळाले आहे. चौथ्या पारितोषिकासाठी प्रत्येकी 5 लाख रुपये आहेत. VA 714724, VB 570166, VC 271986, VD 533093, VE 453921 आणि VG 572542 हे चौथ्या पारितोषिकासाठी पात्र आहेत. पाचवे पारितोषिक सहा जणांसाठी मिळाले असून त्यांना प्रत्येकी 2 लाख रुपये मिळणार आहेत. VA 359107, VB 125025, VC 704607, VD 261086, VE 262870, आणि VG 262310 या क्रमांकाच्या तिकिटासाठी पाचवे बक्षीस मिळाले आहे.