चंदीगड - गाडीचा व्हीआयपी नंबर प्लेट्स किंवा फॅन्सी नंबर प्लेट्सच्या क्रेझमध्ये लोक मागितलेली किंमत खर्च करण्यास तयार आहेत. असेच, एक प्रकरण चंदीगडमध्ये पाहायला मिळाले. (Chandigarh registering and licensing authority) येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या होंडा अॅक्टिव्हा स्कूटरसाठी व्हीआयपी नंबर प्लेट मिळविण्यासाठी 15 लाखांपेक्षा जास्त खर्च केला, ज्या स्टूटीची किंमत फक्त 71 हजार रुपये आहे.
15.44 लाख रुपये त्यांनी दिले - 42 वर्षीय ब्रिज मोहन यांचा जाहिरातीचा व्यवसाय आहे. तो चंदिगडच्या (सेक्टर-23)मध्ये राहतात. चंदीगड नोंदणी आणि परवाना प्राधिकरणाने आयोजित केलेल्या लिलावात ब्रिजमोहनला नुकतीच फॅन्सी नंबर प्लेट मिळाली आहे. (CH01-CJ-0001)हा वाहन क्रमांक घेण्यासाठी त्याने 15.44 लाख रुपये त्यांनी दिले आहेत.
काही दिवसांनंतर माझ्या कारवर असेल - मोहन यांनी सांगितले की ते भविष्यात आपल्या कारसाठी हा नंबर वापरण्याचा विचार करत आहेत. जरी सुरुवातीला हा नंबर स्कूटरवर दिसणार असला. तरी तो काही दिवसांनंतर माझ्या कारवर असेल असही ते म्हणाले आहेत. हा नंबल काही दिवसांसाठी स्कुटीवर असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
एकूण 1.5 कोटी रुपये मिळाले - मोहनने खरेदी केलेली नंबर प्लेट (CH01-CJ)या एक सिरीज झाली होती. त्यावर त्या कंपनीनेही मोठी कमाई केली आहे. 14 एप्रिल ते 16 एप्रिल या कालावधीत ही लिलाव प्रक्रिया पार पडली. चंदीगड परवाना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 378 नंबर प्लेट्सचा लिलाव करण्यात आला, ज्यांना एकूण 1.5 कोटी रुपये मिळाले.
हेही वाचा - Sugar Season 2022 : यंदाच्या हंगामात भारतातील साखरेचे उत्पादन १३ टक्क्यांनी वाढणार