ETV Bharat / bharat

श्रीनगर न्यायालयाने सतीश टिकू हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

श्रीनगरमधील स्थानिक न्यायालयाने (A local court in Srinagar ) सोमवारी सतीश टिकू हत्या प्रकरणाची (murder case of Satish Tikoo) सुनावणी ७ जूनपर्यंत पुढे ढकलली (adjourned the hearing). टिकूची हत्या माजी अतिरेकी बिट्टा कराटे याने केली होती.

author img

By

Published : May 23, 2022, 10:30 PM IST

Satish Tikoo
सतीश टिकू

श्रीनगर: याचिकाकर्ते आणि त्यांचे वकील आज न्यायालयात गैरहजर असल्याने या प्रकरणाची सुनावणी ७ जूनपर्यंत तहकूब केल्याचे (adjourned the hearing) न्यायालयाने सांगितले. काश्मिरी पंडित सतीश टिकू यांच्या हत्येचा आरोप (murder case of Satish Tikoo) असलेला जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटचा माजी अतिरेकी व फुटीरतावादी नेता फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटे तुरुंगात आहे. टिकूच्या हत्येनंतर जवळपास 31 वर्षांनी, कुटुंबाने 30 मार्च रोजी श्रीनगरच्या सत्र न्यायालयात कराटेच्या विरोधात याचिका दाखल केली.

त्यानंतर, न्यायालयाने या खटल्याची सुनावणी 10 मे निश्चित केली होती. तथापि, टिकूचे वकील, उत्सव बैंस हे सुरक्षेच्या कारणास्तव कोर्टात अनुपस्थित राहिले. त्यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी होणार होती मात्र पुन्हा याचिकाकर्त्याचे वकील गैरहजर होते. सुरक्षेच्या कारणास्तव याचिकाकर्ता उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्हाला वाटते की याचिकाकर्त्याला या प्रकरणावर लवकर सुनावणी घेण्यात रस नाही आणि ते फक्त वेळ घालत आहेत."

विशेष म्हणजे, 1990 मध्ये एका टीव्ही मुलाखतीदरम्यान, कराटे यांनी डझनभराहून अधिक काश्मिरी पंडितांना ठार मारल्याचा गुन्हा कबूल केला होता, परंतु न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान, "ते विधान जबरदस्तीने करायला लावल्याचे सांगत, त्याने हे नाकारले होते." कराटे 1990 ते 2006 पर्यंत विविध आरोपांखाली तुरुंगात होता, आणि 2006 मध्ये काही महिन्यांसाठी जामिनावर सुटला होता. त्याला 2019 मध्ये टेरर फंडिंग प्रकरणात पुन्हा अटक करण्यात आली आणि तेव्हापासून तो तुरुंगात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.