जगदलपूर: गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीवरून नक्षल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. केसलूर एसडीओपी ऐश्वर्या चंद्राकर यांनी सांगितले की, "शुक्रवारी कोडनार पोलीस स्टेशन हद्दीतील काकलूर परिसरात बेकायदेशीर स्फोटकांचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बस्तर पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आणि कारवाईसाठी काकलूर परिसरात रवाना झाले. आणि चेकपोस्ट लावून तपास सुरू केला.
विजापूरमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा कट फसला भैरमगढ भागातील नक्षलवाद्यांना स्फोटकं पोहचवायची होती. केसलूर एसडीओपी ऐश्वर्या चंद्राकर म्हणाल्या, "विजापूरच्या भैरमगढ भागातील नक्षलवाद्यांना स्फोटक सामग्री देण्याची योजना होती. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे काकलूर-बस्तानार रस्त्यावर स्फोटकांचा व्यवहार करताना 9 आरोपींना घेराव घालून अटक करण्यात आली. तेव्हा आरोपींनी नक्षलवाद्यांना स्फोटके पुरवल्याचा गुन्हा मान्य केला आहे.
तर अटक करण्यात आलेल्या 9 आरोपींपैकी 5 आरोपी विजापूर जिल्ह्यातील जंगलात नक्षल मित्र म्हणून सक्रिय होते. त्यानंतर पोलिसांनी सर्व 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून स्फोटक साहित्य जप्त करण्यात आली आहेत.या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी 9 बूस्टर 83 एमएम, 2 बंडल कोडेक्स वायर, 13 नग डिटोनेटर, 3.5 मीटर सेफ्टी फ्यूज, डिटोनेटर फिट केलेले एक्सल वायर, बोलेरो कार, एक दुचाकी, 7 मोबाईल आणि 15 हजार रुपये रोख तसेच तीन किलोचा टिफिन बॉम्ब जप्त केले आहे.
हेही वाचा : Bihar Train Engine Fire : बिहारमध्ये रेल्वेच्या इंजिनला लागली आग.. वाहतूक विस्कळीत