खटीमा (उत्तराखंड) - चंपावत जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. काल रात्री उशिरा एक मॅक्स जीप दरीत कोसळली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. सुखीधांग-दंडमीनार रस्त्यावर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मॅक्स वाहन क्रमांक (UK 04 TA 4712) मधील सर्व लोक पंचमुखी धर्मशाळा, टनकपूर येथील काकनई येथील रहिवासी लक्ष्मण सिंह यांचा मुलगा मनोज सिंह याच्या लग्नात सहभागी होऊन घरी परतत होते. दुपारी 3.20 च्या सुमारास मॅक्स वाहन अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळले. मृतांपैकी बहुतांश हे लक्ष्मण सिंह यांचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना चंपावत येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पतंप्रधानांनी व्यक्त केला शोक -
-
उत्तराखंड के चंपावत में हुई दुर्घटना हृदयविदारक है। इसमें जिन लोगों की मृत्यु हुई है, मैं उनके परिजनों के प्रति अपनी शोक-संवेदना व्यक्त करता हूं। स्थानीय प्रशासन राहत और बचाव कार्य में जुटा हुआ है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">उत्तराखंड के चंपावत में हुई दुर्घटना हृदयविदारक है। इसमें जिन लोगों की मृत्यु हुई है, मैं उनके परिजनों के प्रति अपनी शोक-संवेदना व्यक्त करता हूं। स्थानीय प्रशासन राहत और बचाव कार्य में जुटा हुआ है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 22, 2022उत्तराखंड के चंपावत में हुई दुर्घटना हृदयविदारक है। इसमें जिन लोगों की मृत्यु हुई है, मैं उनके परिजनों के प्रति अपनी शोक-संवेदना व्यक्त करता हूं। स्थानीय प्रशासन राहत और बचाव कार्य में जुटा हुआ है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 22, 2022
पंतप्रधान कार्यालयाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. तसेच पंतप्रधानांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.