म्हैसूर (कर्नाटक) - कर्नाटकमधील म्हैसूर जिल्ह्यातील पेरियापटना कागगुंडी गावातील एका व्यक्तीने आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला. दलित समाजातील मुलाशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. ( A Father Murdered His Daughter In Karnataka ) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश नावाचा आरोपी मंगळवारी पोलीस ठाण्यात आला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, प्री-युनिव्हर्सिटी कोर्समध्ये द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असलेली ही मुलगी वोक्कालिगा समाजाची होती. जी राज्यातील उच्चवर्णीय मानली जाते. तिचे एका दलित मुलासोबत प्रेमसंबंध होते. हा मुलगा लगतच्या मेल्लाहल्ली गावातील रहिवासी असून दोघांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेम होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी मुलीने तिच्या पालकांना फोन करून सांगितले की, मला घरी जायचे आहे. त्यानंतर तीने वडिलांना सांगितले की तिचे अजूनही त्या मुलावर प्रेम आहे. आणि फक्त त्याच्याशीच लग्न करणार आहे. यानंतर वडिलांना मुलीने दलीत मुलावर प्रेम केले आणि त्याच्याशी लग्न करणार आहे अशी तीने भूमीका घेतल्याने पित्याने मुलीचाच खून केला आहे.
हेही वाचा - Sidhu Moose Wala Murder : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात मोठी कारवाई; फरार सौरभ महाकालला अटक