नवी दिल्ली Silicone Lucy : ओखला येथील इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT) मध्ये उघडण्यात आलेल्या मेडिकल रोबोटिक्स सेंटरमुळं वैद्यकीय जगतात मोठे बदल होण्याची आशा निर्माण झाली आहे. यासोबतच स्वदेशी तंत्रज्ञानालाही गती मिळत आहे. या केंद्राची स्थापना IIIT दिल्ली फाउंडेशनच्या iHub अनुभूती, IIT दिल्लीच्या टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हबनं केली आहे. शुक्रवारी डॉक्टर, शास्त्रज्ञांनी इथं डेमो देऊन डॉक्टरांना कसं प्रशिक्षण दिलं जाईल या बद्दल माहिती दिली. आयआयआयटीचे संचालक डॉ. रंजन बोस म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय विज्ञानाच्या मदतीनं मानवी जीवन सुकर करण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे.
डाॅक्टरांना प्रशिक्षण : सिलिकॉनपासून बनवलेली 2500 ग्रॅम वजनाची नवजात ल्युसीला बघून कोणीही गोंधळून जाईल. ल्युसीचा श्वासोच्छवास, तिचे हृदयाचे ठोके पाहून तिला जिवंत नवजात बाळ समजेल. मात्र, वास्तविक, हे नवजात नियोनेटल लंग सिमुलेटर सिलिकॉनं तयार केलंल बाळ आहे. जे डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहे. इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT) येथे सिलिकॉन सिम्युलेशनच्या माध्यमातून वैद्यकीय गंभीर रुग्णावर व्हेंटिलेटर बसवणे, त्याची ऑक्सिजन पातळी नियंत्रित करणं, हृदयाचे ठोके नियंत्रित करण्याचे प्रशिक्षण डाॅक्टरांना दिलं जाईल.
डॉक्टर सिम्युलेशनवर सराव : गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर बसवण्याची प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची असते. नवजात मुलांच्या बाबतीत हे आणखी कठीण आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर मुलांना व्हेंटिलेटर देण्याचा सराव करू शकत नाहीत. यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षणाची गरज असते. आतापर्यंत डॉक्टर प्लास्टिकच्या पुतळ्यांवर याचा सराव करत होते. परंतु यात समस्या अशी होती की मुलाला पूर्णपणे मूळ स्वरूप देणे कठीण होतं. मॅव्हरिक कंपनीने विकसित केलेले सिम्युलेशन, आयआयआयटी येथे सुरू झालेल्या मेडिकल रोबोटिक्स सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यावर मुलांशी संबंधित सर्व वैद्यकीय प्रक्रिया डॉक्टर करू शकतात.
हा होणार फायदा : मॅवेरिकचे सह-संस्थापक डॉ. रितेश कुमार म्हणाले की, भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. जिथे वैद्यकीय विद्यार्थी सिलिकॉनच्या सिम्युलेशनवर सराव करतील. Maverick ने सर्व सिम्युलेशन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानानं तयार केलं आहे. त्यांनी सांगितलं की लुसी आता फुफ्फुस, हृदयाशी संबंधित आजारांसाठी तयार करण्यात आली आहे. येणार्या काळात, आम्ही असं सिम्युलेशन तयार करत आहोत, ज्यामध्ये मानवी शरीराशी संबंधित सर्व रोगांचे उपचार, त्यांची लक्षणं इत्यादींचा समावेश असेल. यामुळं डॉक्टरांना रुग्णाला समजून घेणं, उपचार करणं खूप सोपं होईल.
हेही वाचा -
- Assembly Elections 2023 : एमपीसह छत्तीसगडमध्ये विजय निश्चित, राजस्थानमध्ये जोरदार लढत, राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
- Vande Bharat Train : देशातील 11 राज्यांना गिफ्ट! पंतप्रधान मोदींच्या हस्ते नऊ वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण
- Puncture Mechanic Son Becomes Judge : पंक्चरवाल्याचा मुलागा झाला न्यायाधीश, वाचा अहद अहमदची यशोगाथा