ETV Bharat / bharat

Karnataka : म्हैसूरमध्ये 38 जोडप्यांचे पुनर्मिलन; 52 वर्षांपूर्वी वेगळे झालेले जोडपे पुन्हा एकत्र राहण्यास तयार - Husband is 85 years old and wife is 80 years old

कर्नाटकात 52 वर्षांपूर्वी घटस्फोट घेतलेल्या जोडप्याने पुन्हा एकत्र राहण्याचे मान्य केले आहे. पतीचे वय 85 वर्षे तर पत्नीचे वय 80 वर्षे आहे. विशेष न्यायालयाने 38 घटस्फोटित जोडप्यांना पुन्हा एकत्र केले आहे. वाचा संपूर्ण बातमी.

52 वर्षांपूर्वी वेगळे झालेले जोडपे
52 वर्षांपूर्वी वेगळे झालेले जोडपे
author img

By

Published : Jun 27, 2022, 8:24 PM IST

हुबळी (कर्नाटक) : 52 वर्षांपूर्वी वेगळे जीवन जगण्याचा निर्णय घेतलेले जोडपे पुन्हा एकत्र आले आहे. दोघांनीही आपले उर्वरित आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकअदालतीने या जोडप्याला पुन्हा एकत्र केले. 85 वर्षीय बसप्पा अगाडी ( 85-year-old Basappa Agadi ) आणि 80 वर्षीय कल्लव अगाडीने ( 80-year-old Kallava Agadi ) पुन्हा एकत्र राहण्याचे मान्य केले आहे. धारवाड जिल्ह्यातील कालाघाटगी तालुक्यातील जिन्नूर गावातील हे जोडपे 52 वर्षांपूर्वी वेगळे झाले ( A couple who divorced 52 years ago ) होते.

न्यायालयाच्या आदेशानुसार बसप्पा आघाडी दर महिन्याला कल्लाव यांना देखभालीचा खर्च देत असे. मात्र, बसप्पा काही महिन्यांपासून देखभालीचे पैसे देऊ शकले नाहीत. त्यावर कल्लव यांनी न्यायालयात धाव घेतली. स्थानिक वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. हे प्रकरण लोकअदालतीद्वारे निकाली काढण्याचे ठरले. देखभालीचा खर्च देण्यात अपयशी ठरलेल्या बसप्पा अगाडीला न्यायाधीशांनी बोलावले. कोर्टात एका वृद्ध जोडप्याला पाहून न्यायाधीशांना आश्चर्य वाटले. न्यायाधीश जीआर शेट्टर यांनी दोघांची समजूत काढली. ज्यामुळे जोडप्यांचे पुनर्मिलन करण्यात न्यायालयाला यश आले. या खटल्याचे वकील जी.आर.गंगेरा हे होते.

लोकअदालत
लोकअदालत

म्हैसूरमध्ये 38 जोडप्यांचे पुनर्मिलन: म्हैसूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA) ने शनिवारी राष्ट्रीय लोकअदालती दरम्यान 38 जोडप्यांना पुन्हा एकत्र केले ( special Adalat 38 couples reunited ) त्यांच्यातील मतभेद विसरून पुन्हा एकत्र येण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. म्हैसूर शहर आणि तालुका न्यायालयात 1,50,633 खटले प्रलंबित आहेत, त्यापैकी 70,281 निकाली काढण्यात आले आहेत.

हेही वाचा -अहमदाबादच्या सानंदमध्ये मुसळधार पाऊस-वादळामुळे 20 हून अधिक घरांचे नुकसान, 8 जण जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.