कुड्डालोर (तामिळनाडू) : लहान मुलांच्या हाती गाडी दिली की काय होऊ शकते याचा प्रत्यय इथे नुकताच आला विरुधाचलमजवळील विजयमानगरम गावातील शिवगुरु यांचा एक 13 वर्षाचा मुलगा बाईक घेऊन निघाला. सकाळी बाईकवरुन आपल्या शेताकडे तो जात होता. त्यावेळी कोल्लाई गावात अपघात झाला. या अपघातात मालारविझी नावाच्या ३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. अपघातानंतर या मुलीला दुचाकीने काही अंतरापर्यंत फरफटत नेले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
त्यानंतर त्यांनी गाडी घेऊन जाणारा मुलगा आणि त्याच्या वडिलांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वडील शिवगुरू यांना अटक करण्यात आली. त्यांना विरुधाचलम सब जेलमध्ये पाठवण्यात आले. मुलाला कुड्डालोरच्या बालसुधार शाळेत पाठवण्यात आले. या घटनेने लोक हैराण झाले आणि सरकारने 18 वर्षाखालील मुलांवर बाईक चालवण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची विनंती केली.