राजस्थान (जोधपूर) - राजस्थानमधील जाधपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी हाय अलर्टवर जारी केला असून आतापर्यंत 97 जणांना अटक केली आहे. (Jodhpur violence) 2 मे'च्या रात्री उशिरा स्पीकरवरून झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
-
Jodhpur Violence: Police on high alert, 97 people arrested so far
— ANI Digital (@ani_digital) May 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/nGF0qmDJXI#Jodhpur #JodhpurViolence #JodhpurClashes pic.twitter.com/T8ysZYUDge
">Jodhpur Violence: Police on high alert, 97 people arrested so far
— ANI Digital (@ani_digital) May 4, 2022
Read @ANI Story | https://t.co/nGF0qmDJXI#Jodhpur #JodhpurViolence #JodhpurClashes pic.twitter.com/T8ysZYUDgeJodhpur Violence: Police on high alert, 97 people arrested so far
— ANI Digital (@ani_digital) May 4, 2022
Read @ANI Story | https://t.co/nGF0qmDJXI#Jodhpur #JodhpurViolence #JodhpurClashes pic.twitter.com/T8ysZYUDge
यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ईदच्या कार्यक्रमानिमित्त लावलेले झेंडे उखडून टाकले. या दरम्यान, लाऊडस्पीकर फोडले. या घटनेचा व्हिडीओ मुस्लिम समुदायामध्ये व्हायरल झाला. त्यानंतर मोठ्या संख्येने समाज एकत्र येथे हिंसाचाराची घटना घडली.
या घटनेनंतर काही काळ तणवाचे वातावरण होते. मात्र, प्रशासनाने भाजप नेते आणि समाजातील लोकांमध्ये समझोता घडवून आणला. त्यानंतर सकाळची नमाज शांततेत पार पडण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकांनी सकाळी 8.30 वाजता ईदची नमाज अदा केली.
दरम्यान, तणावाच्या वातावरणात भाजपचे नेते सकाळी 10 वाजता घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी निदर्शने सुरू केली. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी हनुमान चालिसाचे पठण केले.
हेही वाचा - जोधपूर हिंसाचार : जोधपूरमध्ये तणावाची स्थिती; झेंडा लावण्यावरून दोन गटांत दगडफेक
जोधपूर हिंसाचारानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. मुख्यमंत्र्यांनी डीजीपीसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. गेहलोत यांनी राज्याचे गृहमंत्री तसेच जोधपूरचे प्रभारी मंत्री यांना हेलिकॉप्टरने तेथे जाण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा - Raj Thackeray : राज ठाकरेंची हिंदूंना साद.. म्हणाले, हनुमान चालीसा वाजवाच, आता नाही तर कधीच नाही