ETV Bharat / bharat

91 Year Old Coolie : 'ओझे उचलले नाही तर भीक मागायची वेळ येईल', 91 वर्षीय किशनचंद आजही लोकांचा भार उचलून करतात उदरनिर्वाह! - कुली किशनचंद

हरियाणाच्या पानिपत रेल्वे स्थानकावरील ९१ वर्षीय हमाल किशनचंद हे त्यांच्या प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानासाठी प्रसिद्ध आहेत. फाळणीनंतर पाकिस्तानातून पानिपतला आल्यानंतर किशनचंद वयाच्या १५ व्या वर्षापासून पानिपत रेल्वे स्थानकावर कुली म्हणून काम करत आहेत. त्यांनी आयुष्याची सुरुवातही इथूनच केली आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात लोकांचे ओझे वाहून ते इथेच जगत आहेत.

kishnchand
किशनचंद
author img

By

Published : Jan 27, 2023, 12:04 PM IST

पानिपत (हरियाणा) : ज्या वयात लोकांना घरात आरामात जीवन जगायचे असते त्या वयात 91 वर्षीय हमाल किशनचंद आजही रेल्वे स्टेशनवर लोकांचा भार उचलत आहेत. ईटीव्हीच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका प्रेरणादाई व्यक्तीची ओळख करून देत आहोत, ज्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात या रेल्वे स्थानकावर केली आणि आयुष्याच्या अखेरीसही या रेल्वेस्थानकावरच काम करत आहे. जुन्या काळातील प्रत्येक माणूस कुली किशनचंदला ओळखतो आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुकही करतो.

फाळणीनंतर भारतात आले : किशनचंद सांगतात की फाळणीपूर्वी ते पाकिस्तानातील खेलैया जिल्ह्यात राहत होते. भारताची फाळणी झाली तेव्हा ते पाकिस्तानातून भारतात आले. फाळणीचे रक्तरंजित दृश्य त्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले आहे. पाकिस्तानातून भारतात आलेल्या किशनचंद यांच्या कुटुंबाने पानिपत स्टेशनवरच पहिले पाऊल ठेवले. त्यावेळी किशनचंद यांचे वय सुमारे 15 वर्षे होते. राहायला घर नसल्यामुळे त्यांनी स्टेशनलाच आपले घर मानले. पोट भरण्यासाठी काहीतरी काम तर करावेच लागते त्यामुळे त्यांनी स्टेशनवरच हमाल म्हणून काम सुरु केले. अशाप्रकारे 1947 मध्ये आठ नंबरचे कुली म्हणून किशनचंद यांचे नवीन जीवन सुरू झाले. कालांतराने त्यांची मजबुरीच त्यांचा व्यवसाय बनला. आज किशनचंद 91 वर्षांचे असून घरच्या मजबुरीमुळे ते आजही लोकांचा भार उचलत आहेत.

दिवसाचे 13 तास काम करतात : वयाच्या 91 व्या वर्षी किशनचंद यांची डळमळणारी जीभ आणि थरथरणारे हात आजही त्यांच्या प्रामाणिकपणाची आणि स्वाभिमानाची साक्ष देतात. वयाच्या 35 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले आणि त्यांना एक मुलगी आणि चार मुले आहेत. मात्र चार मुलगे असूनही तो स्वत: हमाल म्हणून काम करून आपला खर्च भागवतात. किशन चंद यांनी सांगितले की त्यांचे चार मुले खूप मेहनत करतात, पण त्यांनी कधीही त्यांच्या मुलांसमोर हात पुढे केला नाही. ते सकाळी 8 वाजता रेल्वे स्टेशनवर पोहोचतात आणि रात्री 9 वाजेपर्यंत तेथे हमाल म्हणून काम करतात.

ओझे उचलले नाही तर भीक मागायची वेळ येईल : किशनचंद सांगतात की, जेव्हा कोळशाची इंजिने चालायची आणि फायरमन दिल्लीहून येणाऱ्या ट्रेनमध्ये कोळसा टाकायचे, तेव्हा ते थकायचा. त्यामुळे त्यांना अंबालापर्यंत कोळसा नेण्यासाठी १ रुपये दराने भाड्याने ठेवण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून कित्येक सरकारे आली आणि गेली मात्र आजपर्यंत त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. लालू प्रसाद यादव आणि रामविलास पासवान रेल्वे मंत्री झाल्यावर त्यांनी हमालांना रेल्वेत नोकऱ्या देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. परंतु ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी आहे अशा हमालांना हे काम देण्यात आले. हा ठराव ज्यावेळी मंजूर झाला त्यावेळी किशनचंद 50 वर्षांचे होते. त्यामुळे त्यांना कोणतीही सरकारी मदत मिळाली नाही. आजही किशनचंद दरवर्षी 90 रुपये भरून आपल्या परवान्याचे नूतनीकरण करून घेतात. जेव्हा आम्ही त्यांना विचारले की, या वयात तुम्ही हे ओझे कसे उचलू शकता, तेव्हा त्याने नम्रपणे उत्तर दिले की, जर मी हे ओझे उचलले नाही तर मला भीक मागायची वेळ येईल.

200 रुपयांच्या रोजंदारीसाठी संघर्ष : जेव्हा एखादा व्यक्ती किशनचंदला त्यांच्या वयाचा विचार करून जास्त पैसे देऊ करते, तेव्हा ते त्याला नकार देतात व फक्त त्यांच्या मेहनतीचेच पैसे घेतात. आज ते 100 ते 200 रुपये रोजंदारीसाठी झगडत आहेत. त्यांनी पानिपत स्टेशनवर एक आना व दोन आण्यांनी आपले काम सुरू केले होते. किशनचंद सांगतात की, कधी कधी त्यांची रोजची मजुरी 400 रुपयांपर्यंत जाते तर कधी कधी त्यांना स्टेशनवरून रिकाम्या हातांनीच परतावे लागते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.