जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमधील जोबनेर स्टेशनच्या हद्दीतील भोजपुरा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी सकाळी ३०० फूट खोल बोअरवेलमध्ये एक ९ वर्षीय मुलगा पडला. मित्रांसोबत खेळता-खेळता हा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच सिव्हील डिफेंस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मुलाला वाचविण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान घटनेच्या ठिकाणी जोबनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारीही तेथे पोहोचले आहेत.
कशी घडली घटना : स्थानिकांनी या घटनेविषयी दिलेल्या माहितीनुसार, भोजपुरा गावातील हा बोअरवेल खूप दिवसांपासून बंद आहे. या बोअरवेलच्या पाईपावर एक दगड ठेवण्यात आला होता. शनिवारी सकाळी शेतात असलेल्या या बोअरवेल जवळ खेळत होते. खेळता-खेळता या मुलांनी बोअरवेलच्या पाईपावरील दगड बाजूला केला. यामुळे लहान ९ वर्षाचा मुलगा त्यात पडला. या मुलाचे नाव अक्षित ऊर्फ लकी असे आहे. लहान मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांनी गर्दी केली आणि तेथील पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर सिव्हील डिफेंस आणि एनडीआरएफचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बोअरवेलमधून मुलाचा आवाज ऐकू येत आहे.
वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू : मिळालेल्या माहितीनुसार, एसडीएम,अरूण कुमार जैन, तहसीलदार पवन चौधरी, जोबनेर डीएसपी मुकेश चौधरी, तसेच स्टेशनचे प्रभारीसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे बोअरवेल हे साधरण ३०० फूट खोल असल्याचे सांगितले जात आहे. बोअरवेलमध्ये अडकलेला मुलगा हा किती खोलवर अडकला आहे, याची माहिती एनडीआरएफचे जवान मिळवत आहेत.
हेही वाचा -