ETV Bharat / bharat

Congress Plenary Session 2023: 'आम्ही इंग्रजांना घाबरलो नाही तर, भाजप नेत्यांना का घाबरणार..', काँग्रेसचे 85 वे राष्ट्रीय अधिवेशन सुरू - Congress session in Raipur

आजपासून छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे ८५ वे राष्ट्रीय अधिवेशन सुरू झाले आहे. आज सुकाणू समितीची पहिली बैठक होत आहे. दुपारी चार वाजता विषय समितीची बैठक होणार आहे. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसचे बडे नेते रायपूरला पोहोचले आहेत.

85th Plenary Session of Congress begins in Raipur
काँग्रेसचे 85 वे राष्ट्रीय अधिवेशन सुरू
author img

By

Published : Feb 24, 2023, 12:57 PM IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

रायपूर (छत्तीसगड): काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात आज सकाळी १० वाजता सुकाणू समितीची बैठक सुरू झाली. दुपारी चार वाजता विषय समितीची बैठक होणार आहे. सुकाणू समितीची बैठक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री भूपेश बघेल, दिग्विजय सिंह, प्रमोद तिवारी, जयराम रमेश, हरीश रावत यांच्यासह सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते. काँग्रेसने ट्विट केले आहे की, 'देशासाठी चिंतन आणि मंथन सुरू आहे. ते आपले कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे'. काँग्रेसने ट्विट करून असेही म्हटले आहे की, 'लोकशाही वाचवण्यासाठी, जनतेशी संबंधित मुद्दे मांडण्यासाठी रायपूर तयार आहे.

सचिन पायलट

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले काँग्रेस नेत्यांचे स्वागत: छत्तीसगडमधील काँग्रेस अधिवेशनासाठी देशातील विविध राज्यांमधून नेत्यांच्या आगमनाची प्रक्रियाही सुरू आहे. सीएम भूपेश बघेल म्हणाले की, आम्ही सर्वजण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 85 व्या महाअधिवेशनात छत्तीसगडच्या पवित्र भूमीला भेट देणाऱ्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करतो. रायपूरमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन सुरू झाले आहे. आज सुकाणू समितीची पहिली बैठक सुरु आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री भूपेश बघेल, दिग्विजय सिंह, प्रमोद तिवारी, जयराम रमेश, हरीश रावत यांच्यासह सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित आहेत.

काँग्रेस नेते प्रतिक्रिया देताना

काँग्रेसला होणार मोठा फायदा: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम यांनी ‘काँग्रेसला या अधिवेशनाचा मोठा फायदा होईल’, असे म्हटले आहे. भविष्यात आपण काय काम करणार आहोत, आर्थिक धोरण, परराष्ट्र धोरण, कृषी धोरण, आपल्या तरुणांसाठीचे धोरण यावर सुकाणू समिती आणि विषय समितीमध्ये सविस्तर चर्चा केली जाईल. 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी देशभरातून पोहोचलेल्या काँग्रेस नेत्यांना याची माहिती दिली जाणार आहे.

  • 85th Plenary Session of the Congress party led by party president Mallikarjun Kharge gets underway in Raipur, Chhattisgarh pic.twitter.com/WfRKsA24IO

    — ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) February 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम: काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा वादावर मोहन मरकाम म्हणाले की, मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाला घाबरत नाहीत. आम्ही इंग्रजांना घाबरलो नाही तर भाजप नेत्यांना कशाला घाबरणार. लोकशाहीत जनता सर्वात मोठी असते. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जनता काँग्रेसला विजयी करेल.

  • भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के 85वें महाधिवेशन में छत्तीसगढ़ की पावन भूमि पर पधार रहे सभी अतिथियों का हम सब स्वागत करते हैं। #INCPlenaryInCG pic.twitter.com/LWgq2aAQvi

    — Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) February 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एनडीए सरकारचे काऊंटडाऊन सुरू: रायपूर येथे पोहोचलेले काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले की, काँग्रेस अधिवेशनाला देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. येथे जे प्रस्ताव पास होतील, जो संदेश जाईल, तो काँग्रेसच्या प्रत्येक नेत्या-कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करू. एनडीए सरकारचे 2024 चे उलटे काउंटडाऊन येथून सुरू झाले आहे.

हेही वाचा: Gautam Das Modi Controversy: पवन खेडांना अटक म्हणजे काँग्रेस अधिवेशनात खोडा, जयराम रमेश म्हणाले, 'टायगर अभी जिंदा है..'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.