हसन (कर्नाटक): हसन येथील 85 वर्षीय व्यक्तीचा H3N2 संसर्गामुळे मृत्यू झाला. H3N2 संसर्गामुळे मृत्यूची ही कर्नाटकातील आणि देशातील ही पहिलीच घटना आहे. H3N2 हे वृद्धाच्या मृत्यूचे कारण असल्याचा अहवाल मिळाल्यानंतर आरोग्य विभागाचे आयुक्त डी. रणदीप यांनी पुष्टी केली. 1 मार्च रोजी वृद्धाचा मृत्यू झाला होता.
६० वर्षांच्यावरील लोकांवर ठेवणार लक्ष: राज्यात 50 हून अधिक प्रकरणे आधीच नोंदली गेली आहेत आणि आयुक्तांनी पुष्टी केली आहे की, हसनमध्ये पहिल्या व्यक्तीचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे. त्यानुसार आता ६० वर्षांवरील व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या पहिल्या मृत्यूचा संपूर्ण अहवाल द्यावा, कोणीही ऐच्छिक उपचार घेऊ नयेत, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आयुक्तांनी सांगितले.
मंत्र्यांनी घेतली बैठक : नुकतीच आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी नवीन H3 N2 विषाणू बाबत तज्ञांसोबत विशेष बैठक घेतली. या बैठकीत तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य विभागाचे अनेक अधिकारी सहभागी झाले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना नोटीस बजावल्यानंतर ही बैठक झाली आहे. सल्लामसलत केल्यानंतर मंत्री म्हणाले, H3N2 विषाणू धोकादायक नाही. मात्र, खबरदारीचे उपाय आवश्यक आहेत. राज्यात आतापर्यंत काही प्रकरणे आढळून आली आहेत. देशात अधिक H3N2 संसर्गाची नोंद होत असल्याने लोक घाबरले आहेत. या संदर्भात विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. घाबरण्याची गरज नाही. मात्र, खबरदारीचे उपाय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
H3N2 व्हायरसची लक्षणे: H3N2 इन्फ्लूएन्झा झालेल्या लोकांमध्ये सामान्य खोकला आणि सर्दी, आणि अगदी सौम्य कोविडची सामान्य लक्षणे दिसून येतात. तथापि, लोकांना ताप, खोकला, घसा खवखवणे, वाहणारे नाक, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा ही लक्षणे दिसल्यास स्वतःची चाचणी घेणे आवश्यक आहे. काही लोकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रासही होत आहे. अनेक ठिकाणी या नवीन वेगवेगळी लक्षणे दिसून येत आहेत.