ETV Bharat / bharat

कोरोना संकटात आशिया-पॅसिफिक भागात 8 कोटी 10 लाख लोकांनी रोजगार गमावले - Asia-Pacific labour markets

'आशिया प‌ॅसफिक इम्प्लॉयमेंट आणि सोशल आऊटलुक 2020' या अहवालानुसार 8 कोटी 10 लाख लोकांच्या नोकऱ्या कोरोना काळात गेल्या आहेत.

इम्प्लॉयमेंट
इम्प्लॉयमेंट
author img

By

Published : Dec 23, 2020, 12:23 PM IST

Updated : Jan 4, 2021, 9:23 AM IST

हैदराबाद - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन केलं. या लॉकडाऊनच्या काळात कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. 'आशिया प‌ॅसफिक इम्प्लॉयमेंट आणि सोशल आऊटलुक 2020' या अहवालानुसार 8 कोटी 10 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

बँगकॉकमध्ये कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात कामाच्या तासामध्ये घट झाली. त्याचा परिणाम नोकऱ्या आणि उत्पन्नावर पडल्याचे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे. आर्थिक वाढ कमी झाल्याने वाढत्या कामगार शक्तीसाठी नवीन रोजगारनिर्मिती नाही.

देशांतर्गत उत्पादनात 3 टक्के तोटा -

जगातील अनेक देशात कामाच्या तासांमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे. पुरुषापेक्षा जास्त नोकऱ्या महिलांनी गमाल्या आहेत. तरुण वर्गांवरही या संकटाचा परिणाम झाल आहे. त्यांनीही या संकटात आपल्या नोकऱ्या गमावल्या. या संकटाचा मध्यमवर्गीय लोकांवर जास्त परिणाम झाला. एकंदरीत, 2020 च्या पहिल्या तीन तिमाहीत आशिया-पॅसिफिक प्रदेशात कामगारांच्या उत्पन्नात 10 टक्क्यांनी घट झाल्याचा अंदाज आहे, एकूण देशांतर्गत उत्पादनात 3 टक्के तोटा झाला आहे. तसेच कार्यरत दारिद्र्य पातळीमध्येही वाढ झाली आहे. अहवालातील प्राथमिक अंदाजानुसार 22 दशलक्ष ते 25 दशलक्ष लोक गरीबीत ढकलले जाऊ शकतात.

हेही वाचा - नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी संकटात - कृषी अर्थतज्ञ डी. नरसिंह रेड्डी

Last Updated : Jan 4, 2021, 9:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.