ETV Bharat / bharat

दिल्ली: लसीकरण होऊनही सर्जनचा मृत्यू; रुग्णालयातील ८० कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग

author img

By

Published : May 10, 2021, 3:29 PM IST

सरोज मल्टीस्पेशलिटी रुग्णालयातील ८० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, रुग्णसेवक आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सरोज रुग्णालय
सरोज रुग्णालय

नवी दिल्ली - राजधानीमधील सरोज सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रुग्णालयाच्या ८० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच रुग्णालयातील सर्जनचा कोरोनामुळे शनिवारी मृत्यू झाला आहे. डॉ. ए. के. रावत असे मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे. त्यांनी महिनाभरापूर्वी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोसही घेतला होता.

सरोज मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. के. भारद्वाज म्हणाले, की डॉ. रावत यांना मार्चच्या सुरुवातीला कोव्हिशिल्डचा दुसरा डोस मिळाला होता. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ते घरी विलगीकरणात होते. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांना १० ते १२ दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे डॉ. भारद्वाज यांनी सांगितले.

हेही वाचा-कोरोनाची दुसरी लाट : पाहा कोणकोणत्या राज्यांनी केलंय पूर्णपणे लॉकडाऊन

सरोज मल्टीस्पेशलिटी रुग्णालयातील ८० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, रुग्णसेवक आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा-कोरोनाची दुसरी लाट : पाहा कोणकोणत्या राज्यांनी केलंय पूर्णपणे लॉकडाऊन

रविवारी कोरोनामुळे २७३ जणांचा मृत्यू-

दिल्लीमध्ये रविवारी कोरोनामुळे २७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३,३३६ जण नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामधील अनेक आरोग्य कर्मचारी हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर कोरोनाबाधित झालेले काही डॉक्टर हे घरी विलगीकरणात आहेत.

दरम्यान, डॉ. रावत यांच्या मृत्यूने वैद्यकीय क्षेत्र सुन्न झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.