ETV Bharat / bharat

Top News in Marathi : आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Jan 8, 2022, 7:00 AM IST

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

top news
टॉप न्यूज

आज दिवसभरात -

  • अनेक राज्यांमध्ये आज पावसाची शक्यता

नवी दिल्ली - सध्या हिवाळा सुरू असतानाही देशभरात अनेक राज्यांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. नवी दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रामध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

  • राज्यसेवा पूर्व परीक्षा वेळापत्रक आज जाहीर होण्याची शक्यता

मुंबई - नववर्षात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना काळात वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांनाही या परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. नव्या वेळापत्रकाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे.

  • मंत्री अशोक चव्हाण यांचा आज नांदेड दौरा

नांदेड - नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे आजपासून दोन दिवसीय नांदेड दौऱ्यावर येत आहेत. आज सकाळी ते मुंबईवरून नांदेडला विमानाने येतील. जिल्ह्यातील अनेक विकासकामांची पाहणी व लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

  • पुणे महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर आजपासून आता १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण

पुणे - लसीकरणाला आणखी गती यावी, यासाठी आजपासून (शनिवार, ८ जानेवारी, २०२२) महापालिकेच्या १८४ केंद्रांवर १५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांना लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरण करून घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

आजचे राशीभविष्य -

काल दिवसभरात -

मुंबई - राज्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतो आहे. आज धडकी भरवणारी रुग्णसंख्या समोर आली आहे. राज्यात सुमारे 40 हजार 925 कोरोनाबाधितांची ( 40925 corona cases in Maharashtra ) नोंद झाली आहे. यापैकी 14 हजार रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

गोवा - भाजप सरकारविरोधात गोव्यातील राजभवन (Goa Rajbhavan) समोर काँग्रेसकडून ठिय्या आंदोलन (Congress Agitation) करण्यात आले होते. या आंदोलनात काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार (Congress leader Kanhaiya Kumar) सहभागी झाले होते. आंदोलक राजभवनात जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पोलिसांनी वाटेतच अडवून माघारी पाठवले. यावेळी बोलताना कन्हैया कुमार पोलिसांना म्हणाले की, 'तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी दिल्लीला जिवंत परत जातोय'. सध्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election 2022) सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे.

मुंबई - गेल्या 77 दिवसांपासून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करूनही कर्मचारी कामावर येत नाहीत. एसटी महामंडळाने निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. महामंडळाने आज ( 7 जानेवारी ) 228 निलंबित कर्मचाऱ्यांना ( ST suspended 228 employees ) बडतर्फ केले आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या 1 हजार 714 वर पोहचली ( ST dismissed 1714 employees ) आहे.

मुंबई - मालेगाव बाॅम्बस्फोट 2008 प्रकरणातील ( Malegaon Bomb Blast Case) १६ व्या साक्षीदाराने आपली साक्ष फिरवली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधातील साक्षीदाराने साक्ष बदलली आहे. या आधी १५ साक्षीदारांनी आपली साक्ष बदलली होती.

मुंबई- अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तुरुंगामधील मुक्काम वाढणार आहे. 100 कोटी कथित वसुली प्रकरणात अटक केल्यानंतर माजी गृहमंत्री देशमुख हे आर्थर रोड तुरुंगामध्ये आहेत. अनिल देशमुख यांनी 4 जानेवारी रोजी जामीनकरिता मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करण्यात ( Anil Deshmukhs bail plea hearing ) केला होता. आज सुनावणी होऊ शकली नसल्याने त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार ( Anil Deshmukhs stay in jail extended ) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.