वैशाली (बिहार) : बिहारच्या वैशालीमध्ये जिवंत बॉम्ब सापडला आहे. हाजीपूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फळ विक्रेत्याजवळ एका मासे पाळण्याच्या कंटेनरमधून पोलिसांनी आठ जिवंत बॉम्ब जप्त केले आहेत. शहर पोलिस ठाण्यापासून 200 मीटर अंतरावर हा बॉम्ब लपवून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या फळ विक्रेत्यावर छापा टाकून त्याला अटक केली आहे. आता हे आठ जिवंत बॉम्ब शहर पोलिस ठाण्यात निकामी करण्यासाठी पाण्यात ठेवले आहेत.
मासळीच्या डब्यातून आठ बॉम्ब जप्त : वैशाली येथील एका फळ विक्रेत्याने अनेक जिवंत बॉम्ब लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एक पथक तयार करून छापा टाकला. पोलिसांनी सांगितले की, फळ विक्रेत्याने सर्व बॉम्ब मासे राखण्याच्या डब्यात लपवून ठेवले होते. तेथून बॉम्ब आणल्यानंतर ते तातडीने निकामी करण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात आणून पाण्यात ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
'हा बॉम्ब घरामागील शेतात सापडला होता. तो मासे असलेल्या एका छोट्या कार्टनमध्ये गुंडाळून ठेवला होता. मी तो तिथे न उघडता घरी नेला आणि घरी जाऊन उघडून पाहिले तर त्यात बॉम्ब सापडला.' मोहम्मद मासूम, आरोपी
गुप्त माहितीवरून छापा टाकून बॉम्ब जप्त : शहर पोलिस ठाण्यापासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या मस्जिद चौकाजवळ फळ विक्रेत्याने जिवंत बॉम्ब घरात लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शहर पोलिस स्टेशनचे अध्यक्ष सुबोध कुमार यांनी एसआय पंकज कुमार यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली आणि त्यांना छापा टाकण्यासाठी मस्जिद चौकातील चौधरी मुबारक अली परिसरात रवाना केले. पोलिस व्हॅन तेथे पोहोचताच फळविक्रेते मोहम्मद मासूम याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पळून जात असताना पोलिसांनी त्याला पकडले. तेथून पोलीस थेट मोहम्मद मासूमसोबत त्याच्या घराची झडती घेण्यासाठी पोहोचले. जिथे घराच्या गच्चीवर असलेल्या अल्व्हेस्टरच्या खोलीत ठेवलेल्या डब्यात बॉम्ब लपवून ठेवण्यात आले होते.
'गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक मस्जिद चौकात छापा टाकण्यासाठी पाठवण्यात आले. तेथून पोलिसांनी 8 जिवंत बॉम्ब जप्त केले आहेत. सोबतच फळ विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. एकूण 8 देशी बनावटीचे सुतळी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिस सखोल तपास करत आहेत.' - सुबोध कुमार, शहर पोलिस स्टेशन, हाजीपूर
हेही वाचा : Cast Census in Bihar: बिहारमध्ये जातनिहाय जनगणना सुरू, सर्वेक्षणाचे काम केले जाणार दोन टप्प्यात