ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याची 75 वर्षे : कुमाऊं केसरी बद्रीदत्त पांडेंची शौर्यगाथा - कुली बेगार कायदा

उत्तराखंडच्या डोंगरदऱ्यांमध्येही सामान्यांच्या शोषणाची एक पद्धत होती, कुली बेगार. या पद्धतीत स्थानिकांना ब्रिटिशांचे सामान कित्येक किलोमीटरपर्यंत आपल्या खांद्यांवरून वाहून न्यावे लागायचे. यासाठी ब्रिटिशांकडून त्यांना कसलाही मोबदला दिला जात नव्हता. बद्रीदत्त पांडे यांनी सर्वप्रथम याला विरोध केला.

स्वातंत्र्याची 75 वर्षे : कुमाऊं केसरी बद्रीदत्त पांडेंची शौर्यगाथा

author img

By

Published : Oct 30, 2021, 6:34 AM IST

अल्मोडा : ब्रिटिश राजवटीदरम्यान भारतीयांवर अनन्वित अत्याचार केले जात होते. जनतेवर वेगवेगळे कर लावण्यात आले होते. याशिवाय इतरही अनेक मार्गांनी भारतीयांचे शोषण ब्रिटिशांकडून केले जात होते. उत्तराखंडच्या डोंगरदऱ्यांमध्येही सामान्यांच्या शोषणाची एक पद्धत होती, कुली बेगार. या पद्धतीत स्थानिकांना ब्रिटिशांचे सामान कित्येक किलोमीटरपर्यंत आपल्या खांद्यांवरून वाहून न्यावे लागायचे. यासाठी ब्रिटिशांकडून त्यांना कसलाही मोबदला दिला जात नव्हता. बद्रीदत्त पांडे यांनी सर्वप्रथम याला विरोध केला.

स्वातंत्र्याची 75 वर्षे : कुमाऊं केसरी बद्रीदत्त पांडेंची शौर्यगाथा

अन्यायकारक कुली बेगार कायदा

संपूर्ण भारतात स्वातंत्र्य लढ्याचे आंदोलन तीव्र झालेले असताना स्थानिक मुद्द्यांकडेही ब्रिटिश राजवटीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. कुमाऊंमध्ये तेव्हा ब्रिटिशांनी स्थानिकांवर कुली बेगार कायदा लादलेला होता. यात ब्रिटिशांकडून स्थानिकांकडून आपली कामे करवून घेतली जात होती. त्याचा मोबदला ब्रिटिशांकडून दिला जात नव्हता. तेव्हा, कुमाऊं केसरी बद्रीदत्त पांडे, मोहनसिंग मेहता यांच्यासह इतर क्रांतीकारकांनी 1921 मध्ये शरयू किनारी हातात जल घेऊन हा कायदा हटविण्याची शपथ घेतली. सुमारे 40 हजार आंदोलकांनी यावेळी या रक्तहीन क्रांतीत सहभाग घेत या काळ्या कायद्याची कागदे नदीत प्रवाहित केल्याचे आंदोलक भुवन कांडपाल यांनी सांगितले.

बद्रीदत्त पांडेंनी फोडली अन्यायाला वाचा

कुमाऊं परिषदेत जहाल आणि मवाळ असे दोन प्रवाह होते. जहाल प्रवाहाच्या आंदोलनाने जनतेत खूप सकारात्मक संदेश गेला. जहाल प्रवाहांनी पटवारींना खाजा देणे बंद केले. पटवारींचा खाजा बंद झाल्यानंतर आपण आंदोलनात सहभागी झाले पाहिजे असे लोकांना वाटल्याचे सवाल संघटनेचे अध्यक्ष रमेश पांडे म्हणाले. बद्रीदत्त पांडेंनी ब्रिटिशांविरोधात हुंकार दिल्यानंतर स्थानिकांनीही कुली बेगार प्रथेला विरोध दर्शविण्याचे धाडस केले. यानंतर कुली बेगार प्रथेविरोधात एक मोठे आंदोलन उभे राहिले.

नातू रविंद्र पांडेंनी वर्णन केला प्रसंग

बद्रीदत्त पांडे यांचे नातू निवृत्त कर्नल रविंद्र पांडे यांनीही त्या प्रसंगाचे चित्तथरारक वर्णन यावेळी सांगितले. तुला ब्रिटिश सरकारची ताकद माहिती आहे का असे इंग्रज अधिकारी त्यांना म्हणाला. तेव्हा बद्रीदत्त पांडे म्हणाले की, तुम्ही अटक करू शकता, गोळी मारू शकता, फाशी देऊ शकता. मात्र मी जे काम करण्यासाठी आलो आहे, ते काम मी करणारच. तेव्हा तु पहाटेच्या तीन वाजण्यापूर्वी इथून निघून जा असे आदेश मी तुला देतो असे इंग्रज अधिकारी म्हणाला. यावेळी तुम्ही लिखीत आदेश द्या असे पांडेजी त्या अधिकाऱ्याला म्हणाले. त्या अधिकाऱ्याने त्यांना लिखीत आदेश दिला. यानंतर हा लिखीत आदेश घेऊन पांडेजी शरयू किनारी आले. यावेळी तिथे उपस्थित जनसमुदायाने त्यांना विचारले कि, तुमचे इंग्रज अधिकाऱ्यासोबत काय बोलणे झाले. तेव्हा अधिकाऱ्याने मला तीन वाजेच्या आत इथून निघून जाण्याचा आदेश दिला आहे असे पांडेजींनी सांगितले. जर तुम्ही कुली देणार असाल तर मी इथून जाईन. जर तुम्ही कुली देणार नसाल तर मी इथून नाही जाणार. तेव्हा जनतेने त्यांना सांगितले की आम्ही कुली देणार नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत. यावेळी पटवारींनी प्रातिनिधिक स्वरुपात आपले रजिस्टर फाडून नदीत प्रवाहित केले. यावेळी पांडेजींनी सर्वांना कुली न देण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले. तेव्हा सर्वांनी एकत्रितपणे शपथ घेतल्याचे रविंद्र पांडे यांनी सांगितले.

कुमाऊं केसरी उपाधीने गौरव

कुली बेगार प्रथा संपुष्टात आणण्यासाठी दिलेल्या योगदानामुळे बद्रीदत्त पांडेंचे नाव इतिहासात अमर झाले. त्यांना कुमाऊं केसरी ही उपाधी देण्यात आली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना बद्रीदत्त पांडे यांच्या शौर्याला कोटी कोटी प्रणाम.

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : मकबूल शेरवानी... भारतीय सैनिकांना मदत करणारा योद्धा..!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.