ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याची 75 वर्षे : जाणून घ्या, ग्वाल्हेरचे खजिनदार अमरचंद्र बांठियांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी.. - ग्वाल्हेरचे खजिनदार अमरचंद्र बांठिया

अनेकांच्या हौतात्म्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक हुतात्मा कामी आले. अशा वीरांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात आले आहे. मात्र काही अमर शहीद असेही आहेत, ज्यांच्याविषयी इतिहासात जास्त लिहिलेले नाही. भारतमातेचे असेच एक सुपूत्र आहेत अमरचंद्र बांठिया.

स्वातंत्र्याची 75 वर्षे : जाणून घ्या, ग्वाल्हेरचे खजिनदार अमरचंद्र बांठियांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी..

author img

By

Published : Nov 20, 2021, 6:04 AM IST

ग्वाल्हेर : अनेकांच्या हौतात्म्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक हुतात्मा कामी आले. अशा वीरांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात आले आहे. मात्र काही अमर शहीद असेही आहेत, ज्यांच्याविषयी इतिहासात जास्त लिहिलेले नाही. भारतमातेचे असेच एक सुपूत्र आहेत अमरचंद्र बांठिया.

स्वातंत्र्याची 75 वर्षे : जाणून घ्या, ग्वाल्हेरचे खजिनदार अमरचंद्र बांठियांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी..

सिंधिया राजघराण्याचे खजिनदार

अमरचंद्र बांठिया हे सिंधिया राजघराण्याचे खजिनदार होते. महाराणा प्रताप यांच्यासाठी आपली संपत्ती दान करणाऱ्या भामाशाह यांचे जन्मस्थळ असलेल्या बिकानेरमध्ये अमरचंद्र बांठिया यांचा जन्म झाला होता. 1793 मध्ये राजस्थानच्या बिकानेरमध्ये बांठिया यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांच्या मनात होती. अमरचंद्र यांच्या वडिलांचा कौटुंबिक व्यवसाय होता. मात्र यात तोटा झाल्याने त्यांना कुटुंबासह ग्वाल्हेरला जावे लागले. ग्वाल्हेरचे तत्कालीन राजे यांनी बांठियांना शरण दिली. त्यांच्याच सल्ल्यावरून बांठिया कुटुंबाने ग्वाल्हेरमध्ये पुन्हा व्यवसायाला सुरूवात केली. बांठिया कुटुंबाची मेहनत आणि प्रामाणिकपणाची चर्चा नंतर परिसरात व्हायला लागली. आर्थिक व्यवस्थापनातील हातोटी बघता जयाजीरीव सिंधियांनी अमरचंद्र बांठियांना खजिनदार म्हणून नियुक्त केले. कोणत्याही व्यापाऱ्याची राजकोषाचा खजिनदार म्हणून नियुक्ती होणे ही मोठी गोष्ट होती. तेव्हा ग्वाल्हेरच्या खजिन्याची माहिती मोजक्याच लोकांना होती. तेव्हा खजिन्याची जबाबदारी अमरचंद्र बांठियांवर होती.

बांठिया कुटुंबाचे ग्वाल्हेरमध्ये चांगले नाव

बांठिया कुटुंबाचे ग्वाल्हेरमध्ये चांगलेच नाव होत होते. अमरचंद्र बांठियांचा साधेपणा आणि कामाविषयीच्या समर्पणाविषयी सर्वांच्याच मनात आदराची भावना होती. हा तो काळ होता जेव्हा देशात ब्रिटिशांविरोधात वातावरण अधिक तीव्र होत होते. अनेक ठिकाणी नागरिक आणि संस्थानिकही ब्रिटिशांविरोधात आवाज बुलंद करायला लागले होते. सन 1857 चा तो काळ होता. स्वातंत्र्यलढा तीव्र होत होता. अमरचंद्र बांठियांच्या कानावरही स्वातंत्र्यलढ्याचे किस्से येत होते. अनेकदा त्यांचे सहकारी त्यांना ब्रिटिशांविरोधात लढण्याचा सल्ला द्यायचे. तेव्हा बांठिया त्यांना म्हणायचे की, मी शस्त्र तर हाती घेऊ शकत नाही. मात्र वेळ आल्यास असे काम करेल की ज्याने स्वातंत्र्य लढ्यात माझेही योगदान मला देता येईल. अमरचंद्र यांच्या मनात लहानपणापासूनच ब्रिटिशांविरोधात संताप होता. देशाविषयी काही तरी करण्याची इच्छा होती. ती वेळ आता येणार होती.

ब्रिटिशांना हद्दपार करण्याचा चंग

हा तो काळ होता, जेव्हा ब्रिटिशांविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या महाराणी लक्ष्मीबाई सर्वात पुढे होत्या. ब्रिटिशांना देशातून हद्दपार करण्याचा चंग त्यांनीबांधला होता. झाँशीवर आसपास असलेल्या ब्रिटिशांच्या मांडलिक संस्थानिकांकडून सातत्याने हल्ले होत होते. ग्वाल्हेरवर महाराणी लक्ष्मीबाईंनी ताबा मिळविला, मात्र संघर्ष संपला नव्हता. लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे हे आपल्या उरलेल्या सैन्यासह ब्रिटिशांना लढा देत होते. मात्र यात महाराणीकडील खजिना संपुष्टात आला होता. त्यांच्या सैन्याला अनेक महिन्यांपासून वेतन मिळाले नव्हते. खाण्या-पिण्याचे सामानही संपुष्टात आले होते. पैशांअभावी स्वातंत्र्यलढा कमकुवत होत चालला होता. वेळ आली होती. अमरचंद्र बांठिया देशाच्या इतिहासात त्यांचे नाव नेहमीसाठी कोरणार होते. ब्रिटिशांना धडा शिकविण्याची इच्छा अधिक तीव्र झाली होती. देशासाठी काहीतरी करण्याची यापेक्षा चांगली संधी आपल्याला कदाचित मिळणार नाही असे अमरचंद्र बांठियांना वाटले.

बांठियांवर राजद्रोहाचा खटला

8 जून 1858 रोजी अमरचंद्र बांठिया स्वातंत्र्यलढ्यात आपली आहूती देण्यासाठी तयार होते. त्यांना माहिती होते की, ते जे करणार आहे त्याचा शेवट मृत्यूशिवाय दुसरा काहीही नसेल. पैशांच्या अभावी स्वातंत्र्य लढा संपुष्टात येऊ नये यासाठी ग्वाल्हेरचा संपूर्ण खजिना अमरचंद्र बांठियांनी महाराणी लक्ष्मीबाई यांच्याकडे सोपविला. अमरचंद्र बांठियांनी त्यांचे काम केले होते. ब्रिटिशांना देशातून हद्दपार करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी त्यांनी लावली होती. त्यांना माहिती होते की आता ब्रिटिश गप्प बसणार नाही. सरकारी खजिना महाराणी लक्ष्मीबाईंच्या हाती लागल्याने ब्रिटिश संतप्त झाले होते. बांठियांसाठी जी देशभक्ती होती, त्याला ब्रिटिश सरकारने राजद्रोह ठरविले. काही दिवसांनंतर 18 जून रोजी महाराणी लक्ष्मीबाईंना वीरगती प्राप्त झाली. त्यानंतर चार दिवसांनी अमरचंद्र बांठियांवर राजद्रोहाचा खटला चालविण्यात आला. त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 22 जून रोजी भर रस्त्यात सराफा बाजारातील एका झाडावर त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

तीन दिवस मृतदेह झाडालाच लटकलेल्या अवस्थेत

ब्रिटिशांनी तीन दिवसांसाठी बांठियांचा मृतदेह झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ठेवला. लोकांच्या मनात ब्रिटिशांविरोधात बंड पुकारण्याविषयी भिती निर्माण व्हावी हा यामागील उद्देश होता. बांठियांच्या हौतात्म्यानंतर त्यांचे कुटुंब ग्वाल्हेरमधून उत्तर प्रदेशला गेले. आजही ग्वाल्हेरमधील सराफा बाजारातील झाडाखाली अमरचंद्र बांठियांचे स्मारक आहे. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या हौतात्म्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याची साक्ष हे स्मारक आजही देत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.