ETV Bharat / bharat

Rape Accused Beaten To Death : अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू - बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाला बेदम मारहाण

रविवारी संध्याकाळी घराजवळ सुकण्यासाठी ठेवलेला शाळेचा गणवेश घेण्यासाठी ती मुलगी आली तेव्हा वृद्धाने या मुलीशी बोलल्याचा प्रयत्न केला. त्याने तिला दारू पाजून अर्धनग्न अवस्थेत घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने तिच्या पालकांना हा प्रकार सांगितल्या नंतर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी वृद्धाला मारहाण केली. (73 year old Rape Accused Beaten To Death). (Rape Accused Beaten To Death by relatives).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 12, 2022, 8:04 PM IST

बेंगळुरू : मुलीला दारू पाजून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून एका 73 वर्षीय व्यक्तीला मुलीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. (73 year old Rape Accused Beaten To Death). ही घटना रविवारी सायंकाळी घडली. (Rape Accused Beaten To Death by relatives). या संदर्भात बेंगळुरू येथील हेन्नूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, असे डीसीपी पूर्व विभाग, भीमा शंकर गुलेद यांनी सोमवारी सांगितले.

वृद्धाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला : पूर्व विभागाचे डीसीपी भीमा शंकर गुलेद यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात समोर आले आहे की, 'मृत वृद्ध कुप्पण्णा हा मूळचा तामिळनाडूचा रहिवासी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे शहरातील बाबूसापल्य येथे वास्तव्य होते. एका 16 वर्षीय मुलीचे घर त्याच्या घराजवळ आहे. रविवारी संध्याकाळी घराजवळ सुकण्यासाठी ठेवलेला शाळेचा गणवेश घेण्यासाठी ती मुलगी आली तेव्हा कुप्पण्णानं या मुलीशी बोलल्याचा प्रयत्न केला. त्याने तिला दारू पाजून अर्धनग्न अवस्थेत घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.'

पीडितेच्या पालकांची वृद्धाला मारहाण : सायंकाळी बाहेरगावी गेलेली आपली मुलगी घरी न आल्याचे लक्षात आल्यानंतर चिंताग्रस्त पालकांनी सर्वत्र शोधाशोध केली. काही वेळाने ते वृद्धाच्या घरी आले असता त्यांना मुलगी अर्धनग्न अवस्थेत आढळली. त्यानंतर मुलीने तिच्या पालकांना हा प्रकार सांगितला. त्यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी वृद्धाला मारहाण केल्याची माहिती डीसीपींनी दिली. या घटनेनंतर पालकांनी हेन्नूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, त्यांना वृद्ध घरात बेशुद्धावस्थेत आढळला. त्यानंतर वृद्धाला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी पुष्टी केल्याचे डीसीपी म्हणाले.

या घटनेप्रकरणी हेन्नूर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत आणि खुनाचा वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृद्धाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पूर्व विभागाच्या डीसीपींनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.