लातेहार (झारखंड) - बालूमाथ पोलीस ठाणे क्षेत्रातील मननडीह गावात मन हेलावून सोडणारी घटना घडली. करमा पूजेनंतर करम डाली विसर्जन करण्यासाठी गेलेल्या 7 मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - पंजाबचे कॅप्टन मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत; काँग्रेस हायकमांडचे आदेश!
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री गावात करमा पूजा संपल्यानंतर शनिवारी गावातील लोक करम डाली विसर्जित करण्यासाठी तलावाकडे गेले. तलावात आंघोळीदरम्यान 7 मुली खोल पाण्यात गेल्या. महिलांनी आरडाओरड केल्याने जवळपासच्या काही लोकांनी तलावात उडी घेऊन मुलींना बाहरे काढले.
तीन मुलींचा जागेवरच मृत्यू
बुडाल्याने तीन मुलींचा जागेवरच मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी चार मुलींना रुग्णालयात नेले, मात्र येथे चारही मुलींना डॉक्टरांनी मृत घोषित केले. मुलींच्या मृत्यू नंतर त्यांच्या कुटुंबाचे रडून रडून हाल झाले आहेत.
मृतांची नावे :
1. रेखा कुमारी, 18 वर्ष (अकलू गंझू, वडील)
2. लक्ष्मी कुमारी, 8 वर्ष (अकलू गंझू, वडील)
3. रीना कुमारी, 11 वर्ष (अकलू गंझू, वडील)
4. मीना कुमारी, 8 वर्ष (लालदेव गंझू, वडील)
5. पिंकी कुमारी, 15 वर्ष (जगन गंझू, वडील)
6. सुषमा कुमारी, 7 वर्ष (चरण गंझू, वडील)
7. सुनीता कुमारी, 17 वर्ष (दिवंगत बिफा गंझू, वडील)
हेही वाचा - बाबुल सुप्रियोंंनी बदलले राजकारणाचे सूर; अचानक घेतला तृणमुलमध्ये पक्षप्रवेश