गाझियाबाद (उत्तर प्रदेश) - शहरातील राज नगर हद्दवाढ भागातील व्हीव्हीआयपी सोसायटीच्या 14 व्या मजल्यावरुन पडल्याने 6 वर्षाच्या चिमकल्याचा मृत्यू झाला आहे. बाल्कनीत ठेवलेल्या साहित्यावर चढून तो गॅलरीतून खाली डोकावून पाहत होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन मृत्यू झाला आहे.
एक चूक आणि गेला चिमुकल्याचा जीव
घटनेपूर्वी घरात वडील उपस्थित होते. पण, मुलाने जेवण मागितल्याने मुलाचे वडील साहित्या आणण्यासाठी इमारती खाली गेले होते. मात्र, त्यावेळी ते बाल्कनीचा दरवाजा बंद करायचे विसरले. दरम्यान, लहान मुलगा बाल्कनीत गेला व ही घटना घडली.
उंच इमारतीत राहणाऱ्यांनी सतर्क रहावे
शहरातील उंच इमारतीत राहणाऱ्यांनी सतर्कता बाळगावी. कारण, अनेवेळा पाल गॅलरीचा दार उघडेच ठेवतात आणि या एका चुकीमुळे लहानग्यांचा जीव जातो.
हेही वाचा - उत्तर प्रदेश : दाम्पत्य अन् त्यांच्या दोन मुलांना संपवणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा