गुरूग्राम (हरयाणा) - आमदारांना जिवे मारण्याची धमकी आणि खंडणीसाठी कॉल केल्या प्रकरणी 6 जणांना हरयाणा एसटीएफने अटक केली आहे. आमदारांना अनेक फोन क्रमांकावर धमकीचे कॉल येत होते. या क्रमांकांचा तपास केला असता ते मध्यपूर्वेतील देशांमध्ये असल्याचे समजले. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर तपास हरयाणा टास्क फोर्सला देण्यात आला होता. नंतर देशातील विविध तपास यंत्रणांच्या सयुक्त मोहिमेतून या प्रकरणातील आरोपींना शोधून अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - BitCoin Rate In India : बिटकॉईनचे दर किती आहेत, जाणून घ्या
हरयाणा एसटीएफ, केंद्रीय एजन्सी, मुंबई पोलीस गुन्हे शाखा आणि बिहार एसटीएफ यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत, हरयाणाच्या चार आमदारांना धमकावणे आणि खंडणी कॉल करण्याच्या आरोपाखाली सहा गुन्हेगारांना अटक करण्यात आली, असे हरियाणा एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. आरोपींना मुंबई आणि बिहारमधील मुझफ्फरपूर येथून अटक करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. या मोबाईल फोन्सच्या तांत्रिक विश्लेषणातून हे नंबर मध्य पूर्वेकडील देशांमध्ये नोंदणीकृत असून ते पाकिस्तानमधून ऑपरेट केले जात होते, अशी पुष्टी झाली असल्याचे, अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
पंजाबच्या काही माजी आमदारांनाही या मोबाईल नंबरवरून अशाच धमक्या आल्या होत्या. पोलीस महानिरीक्षक (हरयाणा एसटीएफ), बी सतीश बालन यांनी या प्रकरणांचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक (हरयाणा एसटीएफ), सुमित कुमार यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार केले होते. दोन आठवडे चाललेल्या या ऑपरेशनचे वैयक्तिकरित्या निरीक्षण आणि पर्यवेक्षण हरयाणाचे डीजीपी अग्रवाल यांनी केले. या प्रकरणासंदर्भात, डीजीपीला केंद्रीय एजन्सींनी मदत केली होती. हरियाणा एसटीएफने या मोबाइल नंबर आणि आयपी पत्त्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. यामध्ये या तांत्रिक विश्लेषणावर काम करणाऱ्या पाच स्वतंत्र टीमचा समावेश होता. खाते क्रमांकांचा मागोवा घेण्यासाठी, दोन समांतर पथकांनी बिहारमधील मुंबई आणि मुझफ्फरपूरमध्ये छापे टाकले.
दुलेश आलम (रा. बेतिया, बिहार) आणि बद्रे आलम (रा. बस्ती, उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सुमारे 20 पासबुक/चेकबुक, 18 एटीएम, 14 बनावट सिमकार्ड, एक डायरी आणि पाच मोबाईल फोन आढळून आले. त्याचप्रमाणे, बिहारमधील मुझफ्फरपूर येथून हरियाणा एसटीएफने बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील अमित यादव उर्फ राधेश्याम यादव, मोतिहारी जिल्ह्यातील साद्दिक अन्वर, मुझफ्फरपूर जिल्ह्यातील सनोज कुमार आणि बेतिया जिल्ह्यातील काश आलम याला अटक केली आहे.
हेही वाचा - Petrol Diesel Rate Today : जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर