भोपाळ - जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. रुग्ण संख्या वाढतच असून कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. अनेक रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. भोपाळमधील एका खासगी रुग्णालयात सहा रुग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झाला आहे.
मागणीनुसार ऑक्सिजनचा पुरवठा केला जात नसल्याचे रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितले. ऑक्सिजनचा त्वरीत पुरवठा अशी त्यांनी मागणी केली. मृतांच्या नातेवाईकांनी या घटनेप्रकरणी संताप व्यक्त केला आहे.
रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन गरज -
कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज असते. सध्या कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढतो आहे. कोरोना हा मूळ श्वसनाचा आजार आहे. त्यामुळे साहजिकच कोरोनाचे विषाणू सर्वात आधी रुग्णांच्या फुफ्फुसावर हल्ला करतात. परिणामी रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे रुग्णांना दम लागतो. तेव्हा अशा रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन देण्याची गरज भासते.
नालासोपाऱ्यात सात रुग्णांचा मृत्यू -
महाराष्ट्रातील नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तब्बल सात रुग्णांचा तासाभरात मृत्यू झाला आहे. नालासोपाऱ्यातील विनायक हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा असाच वाढता राहीला तर यापेक्षाही आणखी विदारक परिस्थितीत उद्भवण्याची दाट शक्यता आहे.