ETV Bharat / bharat

Todays Top News in Marathi : आज भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये रंगणार पहिला एकदिवसीय सामना; वाचा टॉप न्यूज - आज घडणाऱ्या घडामोडी

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Top News
Top News
author img

By

Published : Feb 6, 2022, 6:00 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर

  • आज भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये रंगणार पहिला सामना

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना आज अहमदाबादमध्ये खेळल्या जाणार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्माकडे अनेक विक्रम रचण्याची संधी आहे.

  • पंजाब काँग्रेस आज मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता

पंजाब काँग्रेस (आज) 6 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करू शकते. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी जेव्हा राज्याच्या दौऱ्यावर येतील, तेव्हा त्यादरम्यान मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली जाऊ शकते. राहुल गांधी यांनी 27 जानेवारी रोजी पंजाबच्या त्यांच्या शेवटच्या दौऱ्यात काँग्रेस मुख्यमंत्री फेस सिद्धू की चन्नी हे जाहीर करु शकते.

  • आज मध्य रेल्वेचा 72 तासांचा मेगाब्लॉग

मध्य रेल्वेवर तब्बल 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी ठाणे ते दिवा या पाचव्या, सहाव्या मार्गाला गती दिली जात आहे.

  • राज्यातील काही जिल्ह्यात आज हलव्या पावसाची शक्यता

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गारठा वाढला आहे. मात्र येत्या २४ तासात महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडी कमी होणार आहे. तर पंजाब, पश्चिम मध्य प्रदेशचा दक्षिण भाग, विदर्भ, छत्तीसगड, ओडिसा, उत्तर मध्य या भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. शिवाय काही भागात आज पाऊसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

कालच्या महत्त्वाच्या बातम्या -

पुणे - पुण्यात शिवसेना कार्यकर्त्यांकडून ( Shivsena Attack Kirit Somaiya ) भाजपा नेते किरीट सोमैयांवर हल्ला करण्यात आला आहे. कोविड सेंटरची तक्रार करण्यासाठी किरीट सोमैया पुण्यात ( Kirit Somaiya In Pune ) आले होते. यावेळी सोमैयांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, किरीट सोमैया यांनी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या हल्ल्यासंदर्भात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil Reaction On Kirit Somaiya Attack ) यांनी जशासतसं उत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हैदराबादमधील दौऱ्यात अचानक ताफा थांबवून ( PM Modi visit Hyderabad ) थेट शेतात पोहोचले. यावेळी त्यांनी शेतात जाऊन हरभऱ्याचा आस्वाद घेतला. हा व्हिडिओ वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.

मुंबई - भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती खालावली होती. त्यांना त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ( Lata Mangeshkar On The Ventilator ) ठेवण्यात आले होते. आता लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती येत आहे. त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांंनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयामध्ये त्या उपचार घेत आहेत.

शिर्डी ( अहमदनगर ) - 'दोघांचे भांडण तिसऱ्यास लाभ' या म्हणीचा उलटा प्रत्यय अकोले येथे पहावयास मिळाला. दोघांचे सुरु असलेल्या भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सरबजीत ओमप्रकाश चौहान या कारागीराला स्वतःचा जीव गमवाव लागलाय( Craftsman Murder In Akole ). या प्रकरणी अकोले पोलिसांनी एकाला अटक केली ( Accused Arrested In Murder Case ) आहे.

गोंदिया : न्यायालयीन खटल्यात आरोपींनी न्यायाधिशांवर भौतिक वस्तू भिरकावल्याच्या अनेक घटना घडल्या ( Plaintiff Threw Slippers On Jugde ) आहेत. मात्र, आज 5 फेब्रुवारी रोजी गोंदिया येथील न्यायालयात न्याय मागणार्‍या फिर्यादीने चक्क न्यायाधीशावर चप्पल भिरकावल्याची घटना दुपारच्या वेळी जिल्हा न्यायालयात ( Gondia District Court ) घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण न्यायालय परिसरात खळबळ उडाली आहे. रवी शंकर काकडे (47 रा. सूर्याटोला) असे आरोपीचे नाव आहे.

मुंबई : मुंबईतील ट्राफिक मुळं दरवर्षी तीन टक्के घटस्फोट होतात, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ( Amruta Fadnavis Mumbai Trafic Jam Statement ) केलं. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्याची राजकारणातील अनेकांनी खिल्ली उडवली. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर आता महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेनेही प्रतिक्रिया दिल्या ( Mumbai NGOs Reaction On Traffic Jam ) आहेत. मुंबईतल्या ट्राफिकमुळे खरंच घटस्फोट होतात का ? हे जाणून घेण्यासाठी आम्ही महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या मुंबईतील कोरो या संस्थेशी संपर्क करत घटस्फोटाची नेमकी कारणं काय असतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.