जम्मू - गांदरबल येथे वीज कोसळून सुमारे 50 मेंढ्या दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मेंढपाळ उन्हाळ्यात आपल्या जनावरांना डोंगराळ भागात घेऊन जात असतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा खालच्या बाजूला घेऊन येतात.
मिळालेल्या माहितीनुसार, गांदरबलच्या हकनार गुंड या गातील मेंढपाळ अब्दुस सलाम चोपन याने रविवारी (दि. 22 मे) दुपारी गुंड क्षेत्रच्या डोंगराळ भागात मेंढ्यांना चारण्यासाठी नेले होते. मात्र, अचानक पाऊस सुरू झाला. त्यानंतर चोपन आपल्या सर्व मेंढ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, अनाचक वीज कोसळली त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, मुसळधार पाऊस व वीज कोसळून सुमारे 50 मेंढ्या दगावल्या आहेत.
हेही वाचा - Truck accident in Purnia : बिहारच्या पूर्णियात भीषण अपघात, पाईपने भरलेला ट्रक पलटी, 8 लोकांचा मृत्यू