आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हैदराबाद दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी रंगारेड्डी जिल्ह्यातील शमशाबादजवळील मुच्छिंतल येथे त्रिदंडी चिन्नाजियार स्वामींच्या सहा वर्षांच्या संकल्प सिद्धीच्या आकारातील रामानुजाचार्यांच्या 216 फूट पंचलोहा पुतळ्याचे अनावरण करणार आहे. या समतामूर्तीच्या प्रतिमेचे अनावरण आज सायंकाळी ७ वाजता होणार आहे.
- हिंगणघाट जळीतकांडची आज महत्त्वपूर्ण सुनावणी
हिंगणघाट येथिल जळीतकांड प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 21 जानेवारी 2022 ला दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर 5 फेब्रुवारीला या प्रकरणाचा निकाल देणार असल्याची माहिती न्यायमूर्तीनी सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली होती. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या पीडित प्राध्यापिकेला जाळण्याचा घटनेला 3 फेब्रुवारीला दोन वर्षे पूर्ण झाले आहे. यामुळे 5 फेब्रुवारीला निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- आजपासून पुढील दोन दिवस मध्य रेल्वेचा 72 तासांचा मेगाब्लॉग
4 ते 6 फेब्रुवारीदरम्यान मध्य रेल्वेवर तब्बल 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी ठाणे ते दिवा या पाचव्या, सहाव्या मार्गाला गती दिली जात आहे. पाचवी, सहावी मार्गिकी 6 फेब्रुवारीपासून खुली होणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली आहे.
- भारत आणि इंग्लडमध्ये आज रंगणार अंतिम सामना
भारताने उपात्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवत अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 96 रन्सनी पराभव केला. आता फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना 5 फेब्रुवारीला आज अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर इंग्लंडशी होणार आहे.
- राज्यातील काही जिल्ह्यात आज पाऊस
राज्यात गेल्या काही दिवसापासून पश्चिमी चक्रवातामुळे गारठा वाढला आहे. मात्र येत्या २४ तासात महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडी कमी होणार आहे. तर पंजाब, पश्चिम मध्य प्रदेशचा दक्षिण भाग, विदर्भ, छत्तीसगड, ओडिसा, उत्तर मध्य या भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. शिवाय काही भागात आज गारपिट तर काही भागात मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
- 5 February Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
- आजची प्रेरणा : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी
कालच्या महत्वाच्या बातम्या -
पणजी (गोवा) - आम्ही ऐतिहासिक निर्णय घेत आहोत. गोवा राज्यासाठी नवीन 'न्याय योजना' सुरू करण्यात येणार आहे. ( 'Nyay Scheme' will be launched Goa ) या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरिबांना महिन्याला 6 हजार रुपये देण्यात येणार आहे. याप्रमाणे वर्षाला 72 हजार रुपये त्यांच्या खात्यात आपोआप जमा होणार आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी ( Gongress leader Rahul Gandhi ) यांनी दिली.
मुंबई : मुंबईतील ट्राफिक जामच्या समस्येमुळे 3% घटस्फोट होतात. त्यामुळे सामान्य नागरिकाप्रमाणे हे सर्व मुद्दे मांडण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष हे पुरोगामी विचाराचे आहेत. संघात आणि भारतीय जनता पक्षात स्त्रियांना मान दिला जातो, असं अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis On RSS BJP ) म्हणाल्या.
औरंगाबाद - अनेकवेळा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या घाटी रुग्णालयात ( Ghati Hospital Delivery ) पुन्हा एकदा ऐतिहासिक शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. 155 किलो वजनाच्या ( 155 Kg Delivery ) महिलेची प्रसूती शस्त्रक्रिया असून जगातील ही 7वी घटना मानली जात आहे.
अमरावती - दर्यापूरकडून अंजनगाव सुर्जी येथे जात असताना कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात ( Accident on Daryapur Anjangaon Road ) कारमधील १७ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर मृत तरुणीचे आई-वडील व अन्य दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता ईटकी फाट्याजवळ घडली. अर्पिता राजेश गिरी (वय-१७) असे मृत तरुणीचे नाव आहे. या अपघातात राजेश त्र्यंबक गिरी (वय-४७), रेखा राजेश गिरी (वय-४०, दोघेही रा. अंजनगाव) हे दाम्पत्य आणि विशाल गजानन सोळके (वय-२८), प्रतिक्षा विशाल सोळके (वय-२३, दोन्ही रा. घोंडसगाव अंजनगाव सुर्जी) असे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
जालना - आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मुंबई-पुण्यातही संख्या कमी होत आहे. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी ती पुन्हा खाली येईल. आता निर्बंध वाढवण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope On Third Wave ) यांनी दिलीय. ते जालन्यात बोलत होते.
पुणे - कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी (Koregaon Bhima Violence) पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या आज चौकशीसाठी चौकशी आयोगासमोर हजर झाल्या होत्या. तब्बल सहा तासांहून अधिक शुक्ला यांची चौकशी सुरू होती. या प्रकरणात आयोग आता तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्राचे महासंचालक विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली.
मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Minister of Finance of India Nirmala Sitharaman ) यांनी सादर केलेला अर्थसंकल्प व मुंबई महानगरपालिकेमध्ये सादर झालेला अर्थसंकल्प हे दोन्ही अर्थसंकल्पावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Mumbai Congress President Bhai Jagtap) यांनी टीका केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प फसवा व सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करणारा असून मुंबई अर्थसंकल्प वाढीव व फुगीर करून दाखवण्यात असल्याची टीका त्यांनी केली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.