हैदराबाद - दहावीच्या चालू वार्षिक परीक्षेत गैरव्यवहार केल्याबद्दल आंध्र प्रदेशातील विविध शाळांमधील तब्बल ४२ शिक्षकांना निलंबीत करण्यात आले असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. (42 Teachers Various Schools In Andhra Pradesh Suspended) काही शिक्षकांनी सरकारला बदनाम करण्यासाठी हे काम केल्याची चर्चाही जोरात आहे. दहावीच्या सार्वजनिक परीक्षा दोन वर्षांनंतर प्रथमच 27 एप्रिलपासून घेण्यात येत आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे परीक्षा घेण्यात आल्या नाहीत.
परीक्षा सुरू झाल्यानंतर दीड तासानंतर कुरनूल जिल्ह्यातून तेलगू प्रश्नपत्रिका छायाचित्रित करून व्हॉट्सअॅपवर प्रसारित करण्यात आली. तेव्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना पहिल्या दिवशी गैरप्रकार आढळून आला. परीक्षा सुरू झाल्यानंतर दीड तासानंतर कुरनूल जिल्ह्यातून तेलगू प्रश्नपत्रिका छायाचित्रित करून व्हॉट्सअॅपवर प्रसारित करण्यात आली.
या सर्व प्रकरणांमध्ये काही शिक्षकांचा हात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बाहेरच्या लोकांच्या मदतीने प्रश्नपत्रिका फुटल्याची अफवा पसरवली आहे. हा घोर दुष्प्रचार होता, कारण प्रश्नपत्रिका फुटली नसून विद्यार्थी आणि पालकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे अस एका शिक्षण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
संबंधित जिल्हाधिकार्यांनी पोलिसांसह गैरप्रकार करणार्यांवर कारवाई केली आहे. दरम्यान, यातील सहभागींना अटक केली आहे. हा कायदा 25 वर्षांपूर्वी लागू करण्यात आला असला तरी, शिक्षकांना गैरव्यवहाराविरुद्धच्या तरतुदींनुसार अटक करण्याची ही पहिलीच वेळ होती, याकडे अधिकाऱ्याने लक्ष वेधले आहे.
हेही वाचा - राज ठाकरेचे अल्टीमेटम नंतर मनसे, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मुंबई सोडण्याचे नोटीस