अरवल (बिहार) - बिहारच्या अरवल जिल्ह्यात बुधवारी रात्री कार कालव्यात कोसळल्याने तीन नर्तकींसह चार जण ठार झाले. या घटनेत जखमी झालेल्या आणखी एका नर्तकीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रविशंकर चौधरी आणि आमदार महानंद घटनास्थळी पोहोचले.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
अरवल पोलीस ठाण्याचे प्रभारी शंभू प्रसाद यांनी गुरुवारी सांगितले की, थिएटरमध्ये काम करणारे कलाकार बुधवारी रात्री पाटण्यात तिलक-समारंभात कार्यक्रम सादर करण्यासाठी निघाले होते. दरम्यान, प्रसादी इंग्रजी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 139 वर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला कालव्यात पडली.
हेही वाचा - मध्यप्रदेश : बोट उलटल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू
तिन्ही नर्तकी ओडिशाच्या रहिवासी, कार चालक फरार
त्यांनी सांगितले की, या घटनेत तीन नर्तकींसह चार जणांचा मृत्यू झाला. लक्ष्मी कुमारी (वय 25 वर्षे), सुप्रिया कुमारी (वय 27 वर्षे) आणि मनीषा कुमारी (वय 26 वर्षे) आणि लकी कुमार (वय 32 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत एक नर्तकी गंभीर जखमी झाली असून तिला पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी पाठविण्यात आले आहे. लक्ष्मी, सुप्रिया आणि मनीषा या तिन्ही नर्तकी ओडिशाच्या रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर कार चालक फरार झाला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा - 20 तासांचे प्रयत्न व्यर्थ; बोअरवेलमधून काढलेल्या चिमुरड्याचा मृत्यू