ETV Bharat / bharat

Todays Top News in Marathi : आज जागतिक कर्करोग दिवस; वाचा टॉप न्यूज - आज घडणाऱ्या घडामोडी

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

top news
top news
author img

By

Published : Feb 4, 2022, 6:00 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • आज जागतिक कर्करोग दिवस

दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी 'जागतिक कर्करोग दिवस' साजरा केला जातो. युनियन ऑफ इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) ने जागतिक कर्करोग दिन हा एक "जागतिक एकत्र येण्याचा उपक्रम" म्हणून घोषित केला आहे. याचा अर्थ असा आहे की, जगभरातील व्यक्तींनी एकत्र येऊन रोग ओळखणे, काळजी घेणे आणि रोगाशी लढण्याचे त्यांना बळ देणे, तसेच रूग्णांना भावनिक आधार देणे असा आहे.

  • राज्यभरात आज साजरी होणार माघी गणेश जयंती

हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यात गणपतीला समर्पित दोन अत्यंत महत्त्वाचे व्रत पाळले जातात. एक म्हणजे सकट चौथ 2022 आणि दुसरी गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी. हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. याच दिवशी गणेशाचा जन्म झाला. गणेशाच्या जन्माचे स्मरण म्हणून ही जयंती साजरी केली जाते.

  • आजपासून पुढील दोन दिवस मध्य रेल्वेचा 72 तासांचा मेगाब्लॉग

4 ते 6 फेब्रुवारीदरम्यान मध्य रेल्वेवर तब्बल 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी ठाणे ते दिवा या पाचव्या, सहाव्या मार्गाला गती दिली जात आहे. पाचवी, सहावी मार्गिकी 6 फेब्रुवारीपासून खुली होणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली आहे.

  • यवतमाळ जिल्ह्यातील महाविद्यालय आजपासून सुरु होणार

अमरावती विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील महाविद्यालय 1 फेब्रुवारी रोजी सुरू झाले आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यात महाविद्यालये 4 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात येणार आहेत. तसेच वाशिम जिल्ह्यातील महाविद्यालये अद्याप सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. त्या त्या जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन संबधित जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती, अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख यांनी दिली आहे.

  • राज्यातील काही जिल्ह्यात आज पाऊस

राज्यात गेल्या काही दिवसापासून पश्चिमी चक्रवातामुळे गारठा वाढला आहे. मात्र येत्या २४ तासात महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडी कमी होणार आहे. तर पंजाब, पश्चिम मध्य प्रदेशचा दक्षिण भाग, विदर्भ, छत्तीसगड, ओडिसा, उत्तर मध्य या भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. शिवाय काही भागात आज गारपिट तर काही भागात मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

  • 'पांघरुण' सिनेमा आज येणार प्रेक्षकांच्या भेटीला

काकस्पर्श, नटसम्राट अशा सर्वोत्कृष्ट कलाकृतीनंतर महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज घेऊन येत असलेला 'पांघरूण' हा चित्रपट 4 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच 'पांघरूण' या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून या चित्रपटात एक विलक्षण प्रेमकहाणी आहे आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सांगितिक मेजवानी आहे.

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

कालच्या महत्वाच्या बातम्या -

पुणे -पुण्यातील येरवडा येथील शास्त्रीनगर गल्ली क्रमांक 8 येथे एका इमारतीचा लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरू असताना ते अचानक कोसळले. यात 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे. ताकीब आलम, सद्दाम आलम, शहीद आणि सोहेल असे मृत्यू झालेल्या चार व्यक्तीचे नाव आहे. तर एका व्यक्तीचे अजूनही कळू शकले नाही. या लोखंडी स्लॉटच्या खाली 10 कामगार काम करत होते त्या वेळी ही घटना घडली आहे. या घटनेतील 5 जणांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. या 5 जणांमध्ये 2 जणांचा प्रकृती चिंताजनक असून 3 जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

पणजी - गोवा विधानसभा निवडणूक 2022 (Goa Assembly Election 2022) साठी बिगुल वाजले आहेत. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या जुन्या पक्षांसोबतच टीएमसी, आरजीपी, जय महाभारत पार्टी, गोएंचो स्वाभिमान पक्ष आणि संभाजी ब्रिगेड या पक्षांनीही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. गोवा विधानसभा निवडणूक 2022 साठी व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार (Goa to vote on February 14) आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्चला कळणार आहे. त्यामुळे भाजपला पूर्ण बहुमत मिळणार की त्रिशंकू विधानसभा (Hung Assembly in Goa) होणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आज ट्विट करून भाजपवर जोरदार हल्ला ( MP Mahua Moitra Criticized BJP ) चढवला. गुरुवारी संध्याकाळी लोकसभेतील भाषणाबाबत त्यांनी संकेत दिले आहेत. 'भाजप खासदारांना माझं भाषण रोखण्यासाठी गोमूत्र पिऊन यावे लागेल', असे ट्विट त्यांनी केले. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपवर विरोधी खासदारांच्या भाषणादरम्यान अडथळे निर्माण केल्याचा आरोप केला आहे.

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी आपले चोपदार विलास मोरे (Vilas More) यांची मुलगी आणि जावयाचा हट्ट पुरवला आहे. अजित पवार हे नेहमीच आपल्या ताठर भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. ते सध्या अर्थसंकल्प तयारीच्या बैठका घेत असून, त्यात ते व्यस्त असतात. अजित पवार यांचे अनोखे रुप मंत्रालयातील उपस्थितांनी अनुभवले आहे. आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयातील चोपदाराच्या मुलीची आणि जावयाची भेटण्याची इच्छा पूर्ण केली.

मुंबई - ताडोबा ( Tadoba National Park) हे वाघ बघण्याचे जागतिक स्तरावरचे सर्वोत्तम स्थळ व्हावे, यादृष्टीने पर्यावरणाचे रक्षण करत पर्यटन विकासाचा एकात्मिक आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी वनविभागाला दिल्या आहेत. यासाठी आवश्यक असणारा निधीही टप्प्या टप्प्याने उपलब्ध करून दिला जावा, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ( Tadoba National Park) पर्यटन वाढीच्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

मुंबई - मुंबई महानगरपालिकेचा २०२२-२३ या वर्षाचा ४५९४९.२१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प ( BMC Budget 2022 ) पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. हा अर्थसंकल्प "मुंगेरी लाल के हसीन सपने", तसेच "गुलाबी स्वप्न" दाखवणारा अर्थसंकल्प असल्याची टीका पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाने केली आहे. तर सामान्यांना त्रास होणार नाही असा विचार करून महसूल कर उत्पन्नाचे स्रोत तयार केले आहेत. पालिकेने आजचा अर्थसंकल्प मुंबईच्या प्रगतीसाठी, भविष्यासाठी सादर केला आहे अशी प्रतिक्रिया सत्ताधारी शिवसेनेकडून देण्यात आली आहे. नेमकं मुंबई अर्थसंकल्पावर मनपा विरोधी पक्ष नेते रवी राजा, भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे, राष्ट्रवादी गटनेत्या राखी जाधव, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे काय म्हणाले ते पाहा व्हिडिओत...

सिंधुदुर्ग - आमदार नितेश राणे यांचे खासगी सचिव राकेश परब हे देखील कणकवली पोलिसांच्या ताब्यात आहेत. यावेळी नितेश राणे आणि राकेश परब यांची कणकवली पोलीस समोरासमोर चौकशी ( Interrogation of MLA Nitesh Rane and Rakesh Parab ) करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.