चेन्नई : तामिळनाडूच्या कड्डलूर जिल्ह्यात असणाऱ्या एका केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट झाला. या स्फोटात चार कामगार ठार झाले असून, कित्येक जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास कारखान्यातील बॉयलरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली.
तामिळनाडूच्या अग्निशामक दलाची पथके याठिकाणी दाखल झाली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. तसेच बचावकार्यही वेगाने सुरू असल्याची माहिती देण्यात आली. जखमींना कड्डलूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...