गडचिरोल - जिल्ह्यात बुधवारी 385 नवीन कोरोनाबाधित आढळून आले तर 228 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 26369वर पोहोचली असून, त्यापैकी 22002 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या 3792 सक्रिय रुग्ण आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 575 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज जिल्ह्यामध्ये एकूण 11 मृत्यू झाले असून, मृतांमध्ये ता. भामरागड येथील 53 वर्षीय पुरुष, ता. अहेरी येथील 62 वर्षीय महिला, ता. कुरखेडा येथील 65 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 28 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी येथील 53 वर्षीय पुरुष, ता. अहेरी येथील 55 वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा येथील 58 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.44 टक्के असून सक्रिय रूग्णांचे प्रमाण 14.38 टक्के तर मृत्यू दर 2.18 टक्के आहे.
जिल्ह्यातील कोरोनास्थिती
नवीन 385 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 96, अहेरी तालुक्यातील 53, आरमोरी 17, भामरागड तालुक्यातील 6, चामोर्शी तालुक्यातील 66, धानोरा तालुक्यातील 21, एटापल्ली तालुक्यातील 13, कोरची तालुक्यातील 9, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये 18, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये 14, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 20 तर वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये 52 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 228 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 123, अहेरी 13, आरमोरी 12, भामरागड 2, चामोर्शी 13, धानोरा 5, एटापल्ली 3, मुलचेरा 4, सिरोंचा 37, कोरची 3, कुरखेडा 3 तसेच वडसा येथील 10 जणांचा समावेश आहे.