ETV Bharat / bharat

महाराष्ट्रानंतर भाजपचे पुढचे 'मिशन' ठरले.. 'या' पक्षाचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात.. 'ऑपरेशन लोटस'ला सुरुवात? - ऑपरेशन लोटस

अभिनेता आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी दावा केला आहे की तृणमूल काँग्रेसचे ३८ आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. यातील २१ आमदार थेट आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी ( Mithun Chakraborty on tmc mlas ) सांगितले. टीएमसीने त्यांचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर भाजपने आता पश्चिम बंगालमध्ये ऑपरेशन लोटसची ( Operation Lotus In West Bengal ) तयारी सुरु केली असल्याचे दिसते.

38 TMC MLA are in direct contact with the BJP, claims Mithun Chakraborty
महाराष्ट्रानंतर भाजपचे पुढचे 'मिशन' ठरले.. 'या' पक्षाचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात.. 'ऑपरेशन लोटस'ला सुरुवात?
author img

By

Published : Jul 27, 2022, 9:21 PM IST

कोलकाता ( पश्चिम बंगाल ) : मिथुन चक्रवर्ती यांच्या वक्तव्यावरून पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप झाला आहे. तृणमूल काँग्रेसचे किमान ३८ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा अभिनेता आणि भाजप नेते मिथुन यांनी केला ( Mithun Chakraborty on tmc mlas ) आहे. यातील २१ आमदार थेट आपल्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रानंतर भाजपने पश्चिम बंगालमध्ये ऑपरेशन लोटस सुरु केले तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. ( Operation Lotus In West Bengal )

मग घाबरता कशाला : मिथुन चक्रवर्ती यांनी पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे. त्यांनी टीएमसी नेत्यांवर ईडीच्या छाप्यांचा बचाव केला. जर कोणी चुकीचे केले नसेल तर त्यांनी घाबरू नये असे ते म्हणाले. भाजपच्या मुस्लीमविरोधी प्रतिमेवर अभिनेते म्हणाले की, हे पूर्णपणे चुकीचे आहे. असे असते तर आज 18 राज्यांमध्ये भाजपची सरकारे नसती, असे मिथुन म्हणाले. भाजप जर मुस्लिमविरोधी असती तर देशातील तीन मोठे स्टार सलमान, शाहरुख आणि आमिर यांना यश मिळाले नसते, असेही ते म्हणाले. पण हे सर्व शक्य आहे.

मिथुनचा दावा खोटा : तृणमूलने त्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की अभिनेता “खोटे दावे करून लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करीत आहे”. टीएमसीच्या खासदार डोला सेन म्हणाल्या की, दादा चांगले अभिनेते आहेत, ते चांगले अभिनय करतात.

१८ राज्यांमध्ये सत्ता : चक्रवर्ती म्हणाले की, भाजप 18 राज्यांमध्ये सत्तेत आहे आणि पक्षाचा झेंडा “अन्य काही राज्यांमध्ये लवकरच फडकवला जाईल”. ते म्हणाले, 'भाजप पश्चिम बंगालमधील लढा थांबवणार नाही. आज राज्यात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका झाल्या तर पक्ष पुढील सरकार बनवू शकतो.

मूर्ख बनवू नका : तृणमूलचे खासदार शंतनू सेन म्हणाले, 'अशा विधानांनी जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. 294 सदस्यीय पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपचे सध्या 75 आमदार आहेत. त्याचबरोबर तृणमूलच्या आमदारांची संख्या 216 आहे. मात्र, भाजपच्या पाच आमदारांनी सभागृह सदस्यत्वाचा राजीनामा न देता सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे.

हेही वाचा : Mithun Chakraborty birthday: मिथुन चक्रवर्तींचा नक्षलवादी ते अभिनेता होण्यापर्यंतचा प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.