ETV Bharat / bharat

Naxalites Surrendered : सुकमामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश, 32 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण - नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

सुकमा येथील नक्षलग्रस्त भागात आघाडीवर तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ननक्षल निर्मुलन आणि पुनर्वसन धोरणामुळे प्रभावित होऊन 30 हून अधिक नक्षलवाद्यांनी मंगळवारी आत्मसमर्पण केले.

Naxalites Surrendered
सुकमामध्ये नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
author img

By

Published : Feb 15, 2023, 9:42 AM IST

सुकमामध्ये नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

सुकमा (छत्तीसगड) : छत्तीसगड सरकारच्या नक्षल निर्मुलन आणि पुनर्वसन धोरणाचा सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहे. बुधवारी 32 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. यापैकी तिघांवर सरकारने मोठे बक्षीस जाहीर केले होते. सुकमाचे पोलीस अधीक्षक सुनील शर्मा यांनी सांगितले की, 'नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी अंतर्गत भागात सतत सुरक्षा दलाच्या नवीन छावण्या उभारल्या जात आहेत. नवीन छावणी सुरू झाल्यामुळे परिसराचा वेगाने विकास होत आहे."

नक्षलग्रस्त भागांत शिबिरांचे आयोजन : सुकमा पोलिस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, 'या आधी आतील भागातील ग्रामस्थ नेहमीच पोलिसांपासून अंतर राखत असत. परंतु शिबिराच्या माध्यमातून सुरक्षा दलाचे कर्मचारी आता त्यांच्या जवळ पोहोचून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी डब्बामरका आणि तोंडमर्का येथे नवीन छावण्या स्थापन करण्यात आल्या होत्या, ज्यांना नक्षलग्रस्त म्हटले जाते. प्रत्येक छावणीच्या स्थापनेनंतर तिसऱ्या दिवशी त्या परिसरात पोलिसांचा प्रभाव दिसून येऊ लागला. यापैकी, पोलिसांनी नवीन कॅम्प डब्बा मार्का येथे सार्वजनिक दर्शन शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांना सीआरपीएफ डॉक्टरांच्या पथकाने आरोग्यविषयक माहिती आणि औषधे दिली होती. तसेच हंगामी रोग टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि खबरदारी घेण्याची माहिती देखील दिली होती.

नक्षलवाद्यांना लवकरच सुविधा उपलब्ध केली जाईल : पोलीस अधीक्षक म्हणाले की, 'आंतरीक भागात शिबिरे सुरू करून गावकऱ्यांना सुविधा आणि विकासकामांची माहिती देण्यात आली. आत्मसमर्पित नक्षलवादी किस्टाराम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध नक्षल कारवायांमध्ये सहभागी होते. नक्षलवादी विचारसरणी सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेल्या या सर्व नक्षलवाद्यांना लवकरच सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले :

  1. डिर्डो मुडा - डीएकेएमएस अध्यक्ष - (1 लाख रुपये इनाम)
  2. हिडमा - सीएनएम अध्यक्ष - (1 लाख रुपये इनाम)
  3. वंजाम हिडमा - मिलिशिया कमांडर - (1 लाख रुपये इनाम)
  4. वेट्टी भीमा - डीएकेएमएस सदस्य
  5. मडवी हुंगी - केएएमएस सदस्य
  6. वेट्टी हिडमा - जीआरडी कमांडर
  7. वंजाम हाडमा - जीआरडी सदस्य
  8. वेट्टी गंगा - जीआरडी सदस्य
  9. वेट्टी जोगा - मिलिशिया सदस्य
  10. माडवी मुक्का, मिलिशिया सदस्य
  11. दुधी देवा - मिलिशिया सदस्य
  12. माडवी नंदा - मिलिशिया सदस्य
  13. कलमू हिडमा - मिलिशिया सदस्य
  14. मडकम सुक्का - मिलिशिया सदस्य
  15. वंजाम मासे - सीएनएम सदस्य
  16. माडवी मुडे - सीएनएम सदस्य
  17. दुधी बीडे - सीएनएम सदस्य
  18. वेट्टी भीम - सीएनएम सदस्य
  19. वेट्टी हिडमा - मिलिशिया सदस्य
  20. दिरदो जोगा - जंगल समिती सदस्य
  21. वेट्टी हाडमा - मिलिशिया सदस्य
  22. दिर्डो हाडमा - सीएनएम सदस्य
  23. वेट्टी रामा - मिलिशिया सदस्य
  24. माडवी हिडमा - मिलिशिया सदस्य
  25. ओयम लखमा - मिलिशिया सदस्य
  26. मडकम लखमा - मिलिशिया सदस्य
  27. वैतीती मुया - सीएनएम सदस्य
  28. ओयामा सुक्का - मिलिशिया सदस्य
  29. मडकम देवा - मिलिशिया सदस्य
  30. वेट्टी लच्छू - मिलिशिया सदस्य
  31. पोडियम देवा - मिलिशिया सदस्य
  32. दुधी गंगा - जीआरडी मिलिशिया सदस्य

हेही वाचा : MLA Nehru Olekar Jail : भाजप आमदाराला भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा, पदाचा गैरवापर केल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.