नवी दिल्ली - कोरोना महामारीत लोकसभेचे दुसरे मान्सून अधिवेशन आजपासून म्हणजेच 19 जुलै रोजी सुरू होत आहे. हे अधिवेशन 13 ऑगस्टला समाप्त होण्याची शक्यता आहे. ही माहिती अधिकृत आदेशात देण्यात आली आहे. या पावसाळी अधिवेशनात 31 विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच कृषी कायदे, शेतकरी आंदोलन, चीन सीमा वाद, लसीकरण आणि इंधन वाढ आदी मुद्दे विरोधक उपस्थित करू शकतात.
कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून पावसाळी अधिवेशन आयोजित केले जाईल आणि अंतरांची काळजी घेतली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी करोना लसीचा किमान एक डोस घेतला असेल, हे तपासल्या जाणार आहे. कोरोना महामारीत संसदेचे हे दुसरे मान्सून अधिवेशन असणार आहे. सामान्यत: संसदेचे मान्सून अधिवेशन हे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. तर स्वातंत्र्यदिनापूर्वी संसदेचे मान्सून अधिवेशन संपते.
गतवर्षी अशी होती मान्सून अधिवेशनात व्यवस्था -
राज्यसभेच्या सचिवालयाच्या नियोजनानुसार वरिष्ठ सभागृहातील सदस्य हे दोन्ही सभागृहाचे सदस्य हे चेंबर आणि गॅलरीमध्ये अधिवेशनादरम्यान बसले होते. संसदेच्या इतिहासात 1952 नंतर प्रथमच अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. चेंबरमध्ये 60 सदस्य बसण्याची व्यवस्था होती. तर राज्यसभेच्या गॅलरीत 51 सदस्य बसण्याची व्यवस्था होती. तर उर्वरित 132 सदस्य हे लोकसभेच्या चेंबरमध्ये बसण्याचे नियोजन होते. बैठक व्यवस्थेचे नियोजन हे लोकसभेच्या सचिवालयाकडून करण्यात आले होते. पहिल्यांदाच मोठे स्क्रिन, दोन्ही सभागृहामध्ये विशेष केबल आणि विभागणी करणारे पॉलिकार्बोनेट बसविण्यात आले होते.
हेही वाचा - चीनबरोबरील सीमावादाचा विषय संसदेत गाजण्याची चिन्हे
हेही वाचा - NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर