नवी दिल्ली/नोएडा: Dogs Attacked Child: नोएडा सेक्टर-100 येथील लोटस बुलेवर्ड सोसायटीमध्ये Lotus Boulevard Society टॉवर-30 जवळ एका वर्षाच्या चिमुरड्यावर तीन भटक्या कुत्र्यांनी हल्ला Child attacked by three unattended dogs केला. कुत्र्यांनी मुलाला अक्षरशः ओरबाडून काढले. रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
एओएचे उपाध्यक्ष धरम वीर यादव यांनी सांगितले की, सोसायटीमध्ये रस्तेबांधणीचे काम सुरू आहे. सेक्टर-110 मध्ये राहणारे राजेश कुमार सोमवारी संध्याकाळी पत्नी सपना आणि मुलांसह बांधकामाच्या ठिकाणी होते. यादरम्यान सपना काम करत असताना तिच्या मुलापासून काही अंतरावर गेली. त्यानंतर तीन मोकाट कुत्र्यांनी अचानक तिच्या मुलावर हल्ला केला. शेजारी खेळणाऱ्या भावाने आवाज देताच आई व आजूबाजूच्या लोकांनी कुत्र्यांपासून बालकाची सुटका केली. रुग्णालयातील डॉक्टर अजित सिंग म्हणाले की, बाळाची प्रकृती चिंताजनक होती, कुत्र्यांनी मुलाच्या पोटात पंचवीस ठिकाणी चावा घेतला होता.
घटनेनंतर लोकांनी पोलिसांनाही माहिती दिली, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात पोहोचून मुलाची प्रकृती जाणून घेतली आणि संबंधित विभागाशी समन्वय साधून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
दिल्ली एनसीआरमध्ये यापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. दिल्लीतील भालसवा डेअरी पोलीस स्टेशन हद्दीतील गुरु नानक देव कॉलनीत सोमवारी एका पिटबुल कुत्र्याने महिलेवर प्राणघातक हल्ला केला. ज्यात ती गंभीर जखमी झाली.