ETV Bharat / bharat

कोरोनामुळे जगभरात एका वर्षात 30 लाख लोकांचा मृत्यू; WHO चा अहवाल

जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी सांख्यिकी अहवाल जारी केला आहे. संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये जगभरात जवळपास ३० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशाने संपूर्ण आरोग्य माहिती प्रणाली उभारणे गरजेचे असल्याचेही सांगितले.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
author img

By

Published : May 22, 2021, 3:27 PM IST

Updated : May 22, 2021, 5:06 PM IST

जिनिव्हा - कोरोनाचा हाहाकार सर्वत्र आहे. जगभरात मृत्यूंची संख्यादेखील मोठी आहे. नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये जगभरात कमीत-कमी अंदाजे 30 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी सांख्यिकी अहवाल जारी केला आहे. तसेच कोरोनामुळे थेट आणि अप्रत्यक्षपणे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. 1 डिसेंबर 2020 पर्यंत जगभरात 8 कोटी 20 लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली. मात्र त्यापैकी केवळ 18 लाख लोकांचाच बळी गेल्याची अधिकृत नोंद आहे. परंतु प्राथमिक अंदाजानुसार पहिल्या लाटेत 30 लाख लोकांचा मृत्यू झालेला आहे.

आरोग्य सुविधा उभारणे महत्त्वाचे -

सध्या संकट काळात आरोग्य डेटा अचूकपणे एकत्रित करणे आणि त्याचा योग्य वापर करण्यासाठी सर्व देशांकडे आवश्यक क्षमता व संसाधने असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मेळ साधत उत्कृष्ट आरोग्य सुविधा उभारण्याचे महत्त्व सर्वच देशांचा समजले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस ‌अॅडॅनॉम घेब्रेयसिस म्हणाले. देशाने संपूर्ण आरोग्य माहिती प्रणाली उभारणे गरजेचे असल्याचेही सांगितले. यामुळे आरोग्यविषयक अचूक अहवाल तसेच माहिती प्राप्त करणे अधिक सुलभ होते. काही देशांमध्ये फक्त रुग्णालयात झालेले मृत्यू किंवा बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. याव्यतिरिक्त, अपुऱ्या आरोग्य यंत्रणेमुळे मृत्यूचे कारण समोर येत नसल्याचा उल्लेख त्या अहवालात करण्यात आला आहे. तसेच आरोग्यसेवा पुरवठा आणि नियमित लसीकरणात व्यत्यय आणणे, लोकांचा निष्काळजीपणा आणि नॉन-कोविड सेवांना निधीची कमतरता, त्यामुळे इतर साथीचा आजार होण्याची शक्यताही वाढली आहे. देशातील आरोग्य विषयक माहिती प्रणालीत लक्षणीय अंतर असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांचा निष्काळजीपणा -

सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क घालणे आणि हात धुणे यासारख्या नागरिकांच्या सवयींमध्ये घट दिसून येते. 79 टक्के लोकांनी घरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. त्यातुलनेने जास्त सदस्य असणाऱ्या घरात 71 टक्के तर अतीगर्दी असणाऱ्या घरात 65 टक्के लोकांनी कोरोना नियमांचे पालन केले आहे. जगातील विविध सामाजिक-आर्थिक स्थितीमुळे हात धुणे, मास्क घालणे यातही समान गोष्टीही अहवालात आढळून आल्या आहेत.

Last Updated : May 22, 2021, 5:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.