ETV Bharat / bharat

Festival In Panihati: बंगालच्या पाणिहाटीतील धार्मिक उत्सवात उष्णतेने 3 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jun 12, 2022, 9:32 PM IST

पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यातील पानिहाटी भागात एका मोठ्या धार्मिक मेळाव्यात रविवारी अती उष्णतेमुळे तीन जणांचा मृत्यू झाला. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील पाणिहाटी येथील इस्कॉन मंदिरात ही घटना घडली. जिल्हा पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिनही मृत व्यक्तींचे वय ६० पेक्षा जास्त आहे. दरम्यान, उष्म आणि गर्दीमुळे आणखी १५ जण आजारी पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बंगालच्या पाणिहाटी येथील धार्मिक उत्सवात उष्णतेच्या लाटेने 3 जणांचा मृत्यू

परगणा (पश्चिम बंगाल) - पश्चिम बंगालमध्ये एका धार्मिक उत्सवादरम्यान उष्णतेमुळे तीन भाविकांचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी सांगितले की, उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील पानीहाटी येथे एका धार्मिक मेळाव्यात वृद्ध भाविकांचा उष्मा आणि आर्द्रतेमुळे मृत्यू झाला. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले.

पाणिहाटी येथील इस्कॉन मंदिरातील दंड महोत्सवात उष्मा आणि आर्द्रतेमुळे भाविकांच्या मृत्यूबद्दल ऐकून दुःख झाले, असे त्यांनी ट्विट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. पोलीस आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, सर्वतोपरी मदत केली जात आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत असही बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

बराकपूर आयुक्तालयाच्या पोलीस सहआयुक्त ध्रुबज्योती डे यांनी सांगितले की, पाणिहाटी येथील हुगळी नदीच्या काठावरील मंदिरात 'डोई-चिरे मेळा' सुरू असताना गर्दीत उष्णतेमुळे लोक गंभीर आजारी पडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. दरवर्षी या दिवशी पुरीहून नवद्वीपाकडे जाताना श्री चैतन्यदेवांच्या आगमनाचे प्रतीक म्हणून पाणिहाटी येथे मोठ्या संख्येने लोक जमतात. दुसरीकडे, पाणिहाटी नगरपालिकेचे अध्यक्ष मोलॉय रॉय यांनी दोन महिलांसह अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला. डे म्हणाले की, मेळ्यातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचे पथक सध्या हजर आहे.

उत्तर 24 परगणा येथील पाणिहाटी येथील जत्रेत गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. गर्दी आणि कडक उन्हामुळे सुमारे 50 लोक आजारी पडले. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यातील अनेक जण गंभीर आजारी पडले. ज्यानंतर तीन जणांचा मृत्यू झाला. अशा स्थितीत जत्रा बंद करण्यात आली आहे. सकाळपासूनच गर्दी जमल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे लोकांची गर्दी तर दुसरीकडे कडाक्याच्या उन्हामुळे तेथे उपस्थित लोकांची अडचण झाली आहे.

हेही वाचा - Sonia Gandhi In Hospital: सोनीया गांधी यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.