नवी दिल्ली : मेघालयातील शिलाँगपासून 173 किमी अंतरावर उत्तर-ईशान्य भागात असलेल्या पश्चिम कामेंग जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. या जिल्ह्यातील अनेक भागात भूकंपाचे किरकोळ धक्के जाणवले. याविषयीची माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नॅशनल सेंटर सिस्मॉलॉजीने दिली आहे. एनसीएसच्या अहवालानुसार भूकंपाचे धक्के पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली 27.02 अक्षांश आणि 92.57 रेखांशावर 33 किमी खोलीवर होते. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार या भूकंपाच्या धक्क्यामुळे आतापर्यंत कोणतीही मानवी जीवितहानी झालेली नाही. तसेच कोणत्याच मालमत्तेचेही नुकसान झाले नाही. परंतु कोणती हानी झाली आहे का याची माहिती मिळवण्यात जिल्हा अधिकारी व्यस्त आहेत.
-
#WATCH | Mumbai, Maharashtra: High waves are seen in coastal areas ahead of Cyclone Biparjoy. pic.twitter.com/I4ZsMii6QI
— ANI (@ANI) June 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Mumbai, Maharashtra: High waves are seen in coastal areas ahead of Cyclone Biparjoy. pic.twitter.com/I4ZsMii6QI
— ANI (@ANI) June 11, 2023#WATCH | Mumbai, Maharashtra: High waves are seen in coastal areas ahead of Cyclone Biparjoy. pic.twitter.com/I4ZsMii6QI
— ANI (@ANI) June 11, 2023
आधीही जाणवले होते भूकंपाचे धक्के : या महिन्याच्या सुरुवातीला आसाममधील तेजपूरला भूकंप झाला होता. या भूकंपाचे केंद्रबिंदू तेजपूरच्या पश्चिमेला 10 किमीवर होते. तेथे सुमारे 37 किमी खोलीवर भूकंपाचे धक्के जाणवले होते. दरम्यान, ईशान्येकडील राज्यांमध्ये कमी तीव्रतेचे हादरे वारंवार जाणवू लागले आहेत. हरियाणातील झज्जर येथे 6 जून रोजी सकाळी 7 वाजून 8 मिनिटांनी 2.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. हे अत्यंत सौम्य भूकंपाचे धक्के 12 किलोमीटरच्या खोलीवर आले होते.अरुणाचल प्रदेशातील चांगलांग येथेही भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी मोजण्यात आली होती.
नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचा इशारा : तज्ञांनी कमी-तीव्रतेच्या भूकंपाचा धोका असलेल्या भागात स्थानिक लोकांनी संवेदनशील बनवण्याची गरज आहे. हलक्या भूकंपाच्या वेळी आश्रय घेण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी अनेक सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (एनजीआरआय) शास्त्रज्ञाने काही दिवसांपूर्वी मोठ्या भूकंपाविषयी दावा केला होता. हिमालयीन भागात लवकरच मोठा भूकंप येऊ शकतो. या भूकंपाची तीव्रता लक्षणीय असू शकते, ज्यामुळे या भागात मोठे नुकसान होऊ शकते. संरचना मजबूत करून जीवित आणि मालमत्तेची हानी कमी केली जाऊ शकते, असेही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पूर्णचंद्र राव यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते की, पृथ्वीचे कवच अनेक प्लेट्सचे बनलेले आहे आणि या प्लेट्स सतत वळत राहतात. भारतीय प्लेट्स दरवर्षी पाच सेंटीमीटरपर्यंत सरकत आहेत. त्यामुळे हिमालयाचा प्रदेश प्रचंड तणावाखाली आहे. त्यामुळे हिमालयीन भागात मोठा भूकंप होऊ शकतो. हिमाचल प्रदेश, नेपाळचा पश्चिम भाग आणि उत्तराखंडमध्ये भूकंप होऊ शकतो. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8 असू शकते.