ETV Bharat / bharat

Presidential Election : राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी २८३ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क - Uddhav Thackeray

राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी ( Presidential Election 2022 ) आज २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात मतदान प्रक्रिया पार पडली. एनडीएच्या द्रौपदी मुर्मु तर युपीएचे यशवंत सिन्हा यांच्या थेट लढत होत असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

Presidential Election
राष्ट्रपती निवडणुक
author img

By

Published : Jul 18, 2022, 9:08 PM IST

मुंबई - देशाच्या १६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया ( Presidential Election 2022 ) पार पडली. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) उमेदवार आहेत. तर, विरोधकांकडून संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा ( Yashwant Sinha ) यांच्यात सरळ लढत होत आहे. भाजप-शिंदे गटाने ( BJP Shinde group ) राष्ट्रपती पदासाठी मुर्मु यांना मतदान करणार असल्याचे जाहीर केले. शिवसेनेनेही मुर्मु यांना पाठिंबा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या आदेशानुसार सेनेच्या आमदारांनी मुर्मु यांना मतदान केले. काँग्रेस, राष्ट्रवादीने यशवंत सिन्हा यांच्या पारड्यात मते टाकल्याचे समजते. मतदानाला सुरुवात होताच सकाळच्या सत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार, ( Leader of Opposition Ajit Pawar ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ( Chief Minister Eknath Shinde ) देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य आणि सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांच्या सदस्यांनी मतदान प्रक्रियेत घेतला होता.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत असलेल्या वेळेत २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती विधिमंडळाचे प्रधान सचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत ( Rajendra Bhagwat ) यांनी दिली. केंद्रीय निवडणूक निरीक्षक अमित अगरवाल, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधिमंडळाचे उपसचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा - Monsoon Session Begin Today : देशासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा - पंतप्रधान; संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू

राष्ट्रपती निवडणुकीचे काय आहे गणित? राष्ट्रपतींची निवड बॅलेट पेपरद्वारे केली जाते. यामध्ये मतदाराला प्राधान्याने मतदान करायचे आहे. या निवडणुकीत दोनच उमेदवार असल्याने मतदाराला पहिली, दुसरी पसंती नमूद करावी लागणार आहे. या निवडणुकीत लोकसभेचे 543, राज्यसभेचे 233, विधानसभेचे 4, हजार 33 सदस्य आहेत. अशा प्रकारे एकूण 4 हजार 809 मतदार होते. लोकसभा, राज्यसभेचे 776 खासदारांच्या मतांची किंमत 5,लाख 43 हजार,200 इतकी आहे.तसेच सर्व आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य 5,लाख 43 हजार 231 आहे. अशा प्रकारे राष्ट्रपती निवडणुकीतील एकूण मतांचे मूल्य 10 लाख 86 हजार 431 आहे.

कसे ठरवते मतांचे मूल्य ? 1971 च्या जनगणनेच्या आधारे आमदार, खासदारांच्या मतांचे मूल्य ठरवले जाते. त्यासाठी लोकसंख्येला राज्यातील आमदारांच्या संख्येने भागले जाते. यानंतर येणार्‍या संख्येला 1 हजानने भागले जाते. मग मिळालेला आकडा म्हणजे आमदारांच्या मताचे मूल्य होय. प्रत्येक राज्यातील आमदारांचे मताचे मूल्य वेगळे असते.

'हे' आहेत राष्ट्रपती पदाचे उमेदवार - द्रौपदी मुर्मू, ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात जन्म. ती आदिवासी संथाल कुटुंबातील आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात शिक्षक म्हणून केली. त्यानंतर कारकून म्हणून काम केले. 1997 मध्ये त्या नगरसेवक झाल्या . सन 2000 ते 2009 मध्ये मयूरभंजच्या रायगंज मतदारसंघातून दोनदा आमदार म्हणुन त्यांनी प्रतिनिधित्व केले. तर 2015 मध्ये त्या झारखंडच्या राज्यपाल झाल्या.

यशवंत सिन्हा - 6 नोव्हेंबर 1937 रोजी पाटण्यातील कायस्थ कुटुंबात जन्म. 1960 मध्ये जिल्हाधिकारी झाले. सन 1984 मध्ये IAS पदाचा राजीनामा देऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सन 1998, 1999, 2009 मध्ये हजारीबागमधून भाजपचे खासदार होते. नोव्हेंबर 1990 ते जून 1991 या काळात चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. 2018 मध्ये त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा - Anil Deshmukh Case : शंभर कोटी वसुली प्रकरण; माजी दोन पोलीस आयुक्तांची सीबीआयकडून चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.