ETV Bharat / bharat

World Tourism Day : २७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन; काय आहे पर्यटनाचे महत्त्व? - जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो

आज २७ सप्टेंबर (27 September is celebrated) हा दिवस 'जागतिक पर्यटन दिन' (World Tourism Day) म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. १९८० पासून 'जागतिक पर्यटन दिन' याच दिवशी साजरा करण्यास सुरुवात झाली. कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची (UNWTO) स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती.

World Tourism Day
जागतिक पर्यटन दिन
author img

By

Published : Sep 23, 2022, 7:57 PM IST

Updated : Sep 27, 2022, 2:01 PM IST

फिरायचं म्हणटलं की आपल्याला आठवतं ते मस्त रम्य हिरवगारं निसर्गाचं ठिकाणं. प्रत्येक जण आपल्या सोईनुसार पर्यटनाचा आनंद घेत असतो. २७ सप्टेंबर हा दिवस (27 September is celebrated) 'जागतिक पर्यटन दिन' (World Tourism Day) म्हणुन साजरा होत असतो.

प्रत्येक वर्षी २५ टक्क्याने वाढ : ज्यांना मुक्त भटकायची, मनमुराद फिरायची आवड आहे अशांना पर्यटन क्षेत्रात कारकीर्द करणे सहज शक्य झाले आहे. आवडचं कारकीर्द झाल्यास मिळणारा आनंद मोठा असतो. दळवळणाच्या सुविधा वाढल्याने मुक्तसंचार करणे आता सोपे झाले आहे. देशाच्या कुठल्याही प्रदेशात किंवा परदेशात गमन करण्याकडे अलीकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. वर्षभरात पर्यटन या क्षेत्रात प्रत्येक वर्षी २५ टक्क्याने वाढ होते. पर्यटन व्यवस्थापन आणि नियोजन या अभ्यास शाखाही आता महाविद्यालयीन शिक्षणात आल्या आहेत. अनेक परदेशी पर्यटन कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. देशातही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो आहे.

जागतिक पर्यटन दिन : सुंदर निसर्ग आणि हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, खोल वाहणाऱ्या दऱ्या, खळ खळत वाहणारी नदी, निळाशार समुद्र, गजबजणारे सागर किनारे आणि अशा ठिकाणी भटकंती साठी मिळणारी संधी कोण सोडेल? एक पर्यटन प्रेमी अशा मिळणाऱ्या सुवर्ण संधीचा नक्कीच सदुपयोग करून घेत असतो. पर्यटन क्षेत्र हे रोजगार निर्मिती करून देणारे क्षेत्र आहे. त्यामुळे जागतिक पर्यटन दिन साजरा करून देशातील पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा याचा प्रयत्न केला जातो. पर्यटन हे असे क्षेत्र आहे त्यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्था सुधारू शकते. एखाद्या विशिष्ट ठिकाणी असणारे नैसर्गिक सौंदर्य आणि तेथील इतिहास जाणून घेण्यासाठी तेथील संस्कृती पाहण्यासाठी देशातील विविध भागातून पर्यटकांनी यावे हा पर्यटनाचा मुख्य हेतू असतो. आपल्याला आलेला थकवा, मनातील दुःख,आजार घालवण्याचे सर्वात स्वस्त आणि सुलभ माध्यम म्हणजे पर्यटन होय. यासाठी कोठेही फिरायला जा अगदी स्वतःच्या घराशेजारी असणारे डोंगरदऱ्या या ठिकाणीं निसर्गरम्य परिसरात गेले तरी अगदी मन ताजे तावाने होऊन सर्व दुःख माणूस विसरून जातो.

कसा करतात पर्यटन दिवस साजरा : जागतिक पर्यटन दिनाच्या दिवशी पर्यटन हौशी लोक विविध नैसर्गिक ठिकाणी भेटी देतात, तेथील सर्व गोष्टी जाणून घेतात. काही मदत करता येत असल्यास ती करण्याचा प्रयत्न करतात. शासन स्थरावर सरकार विविध पर्यटन स्थळांना विकास आराखडा मंजूर केला जातो. पर्यटन स्थळांना विकास करण्यासाठी सर्व सहकार्य केले जाते. शासन पर्यटन स्थळांना विकास आराखडा मंजूर करते. पर्यटन स्थळांचा जागतिक वारसा स्थळांत समावेश व्हावा म्हणून सरकार प्रयत्न करत असते. पर्यटनविषयक लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, पर्यटनास प्रोत्साहन देणे, पर्यटनातून आर्थिक विकास करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच स्थानिक जनतेला रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. पर्यटनातून देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. नवनवीन पर्यटन स्थळांना भेटी, त्यांच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न केले जातात.

व्यवसायाला महत्व : आजच्या काळात पर्यटनास खूप महत्व आहे, पर्यटन व्यवसायात लाखो लोक काम करतात. पर्यटन व्यवसायाची उलाढाल पण अब्जावधी रुपयांत गेली आहे. प्रत्येक देशाला परकी गंगाजळी उपलब्ध करून देणारा व्यवसाय म्हणून पर्यटन व्यवसायाकडे आजच्या काळात पाहिले जाते. पर्यटन व्यवसायात लाखो लोक काम करतात. स्थानिक पातळीवर जनतेला रोजगार संधी पर्यटनामुळे उपलब्ध होत आहे. पर्यटन व्यवसाय आजच्या काळात सोन्याचा भाव मिळवून देणारा व्यवसाय झाला आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जो देश स्वतःच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्न करील. लोकांना आकर्षित करील त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पर्यटनामुळे खूप मदत होणार आहे. सिंगापुर सारखे काही देश पर्यटन या क्षेत्रावर पूर्णपणे अवलंबून आहेत.

भाषेवर प्रभुत्व असायला हवे : या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी फिरण्याची आवड असायला हवी तसेच संवाद कौशल्य उत्तम असणे आणि दोनपेक्षा अधिक भाषेवर प्रभुत्व असायला हवे. काही परदेशी भाषा आत्मसात असल्यास खूप फायद्याचे ठरते. भौगोलिक प्रदेशांची उत्तम जाण असायला हवी. सहकार्यवृत्ती आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य असेल तर लोकांमध्ये पटकन एकरूप होणे सोपे होते. सामाजिक नितीनियमांचा आणि परंपरांचा आदर करणेही गरजेचे असते. त्याचबरोबर त्या देशाचा इतिहास, कला आदीची प्राथमिक माहिती हवी.

Last Updated : Sep 27, 2022, 2:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.