ETV Bharat / bharat

Mother Killed Child In Kerala : बाळ रडतयं म्हणून आईने भिंतीवर डोके आपटून घेतला जीव - पथानामथिट्टा येथे आईने मुलाला मारले

आईने 27 दिवसापूर्वी जन्म दिलेल्या बाळाचा भिंतीवर डोके आपटून जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार केरळ मधील पथानामथिट्टा ( mother killed child in Pathanamthitta ) या भागातून समोर आला आहे. या बाळाचा प्रिमॅच्युअर जन्म झाल्यामुळे ते सारखे आजारी असायचे व सतत रडायचे त्यामुळे वैतागलेल्या आईने हे टोकाचे पाऊल उचलले.

Mother Killed Child
हत्या
author img

By

Published : Dec 14, 2021, 5:52 PM IST

पथानामथिट्टा (केरळ) - नेहमीच आपण आपल्या बाळाला तळहातावरच्या फोटाप्रमाणे साभाळणाऱ्या आईच्या गोष्टी ऐकल्या आहेत. आई आपल्या बाळावर किती प्रेम करते हे आपण शब्दात सांगूच शकत नाही. मात्र केरळ मध्ये आईच्या नात्याला काळिमा फासण्याची घटना उघडकीस आली आहे. येथे एका आईने आपल्या बाळाची हत्या ( 27 day old baby mother killed ) केलाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी आईला ठोकल्या बेड्या -

आईने 27 दिवसापूर्वी जन्म दिलेल्या बाळाचा भिंतीवर डोके आपटून जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार केरळ मधील पथानामथिट्टा ( mother killed child in Pathanamthitta ) या भागातून समोर आला आहे. या बाळाचा प्रिमॅच्युअर जन्म झाल्यामुळे ते सारखे आजारी असायचे व सतत रडायचे त्यामुळे वैतागलेल्या आईने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत आरोपी आईला बेड्या ठोकल्या आहेत.

आई राहत होती 45 वर्षीय प्रियकरासोबत -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, 9 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. त्याच दिवशी दुपारी 11 वाजता या बाळाला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांना दाखवल्यानंतर बाळाला परत घरी सोडण्यात आले. मात्र बाळाचा प्रकृती त्यानंतर ढासळत गेली. अखेर त्याला तालुक्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला. ही 21 वर्षीय आई एका आश्रमात स्वयंपाकाचे काम करत होती. येथेच तिच्या 45 वर्षीय प्रियकरासोबत ती राहत होती. या घटनेनंतर आश्रम चालवणारे फादर जोजी थॉमस यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. त्यानंतर त्यांच्या जवाबानंतर गुन्हा नोंदवून घेण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा - Parents sell Baby Girl : पोटच्या मुलीचाच केला दीड लाखांत सौदा; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.