ETV Bharat / bharat

हरयाणा पोलिसांची दडपशाही, दिल्लीला जाण्यापूर्वीच शेतकऱ्यांचे अटकसत्र

गुरुग्राम जिल्ह्यातील सोहना परिसरातील २५ शेतकरी दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याासाठी निघाले होते. मात्र, पोलिसांनी या सर्व आंदोलकांना अटक केली आहे.

शेतकऱ्यांना अटक
शेतकऱ्यांना अटक
author img

By

Published : Dec 1, 2020, 10:30 PM IST

चंदीगढ - राजधानी दिल्लीत केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पंजाब आणि हरयाणा राज्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीत गेले असून अजूनही शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. दरम्यान, हरयाणा पोलिसांनी दडपशाहीचे धोरण स्वीकारत आंदोलनाला निघण्यापूर्वीच शेतकऱ्यांना अटक करण्यात सुरुवात केली आहे.

हरयाणा पोलिसांची दडपशाही

दिल्लीला पोहचण्याआधीच अटक

गुरुग्राम जिल्ह्यातील सोहना परिसरातील २५ शेतकरी दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याासाठी निघाले होते. मेवात, रेवाडी, महेंद्रगढ आणि कनीला भागातील हे सर्व शेतकरी होते. मात्र, पोलिसांनी या सर्व शेतकऱ्यांना अटक केली. पोलिसांनी शेतकऱ्यांवर १०७/१५१ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आंदोलनाची धग कायम

सर्व शेतकरी मेवातकडून येत असताना सोहना पोलिसांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. नूंह-गुरुग्राम सीमेवरील रायपूर या गावातून त्यांना अटक करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत सुरू असेलले शेतकऱ्यांचे आंदोलन अद्यापही शमले नाही. आज सरकारी प्रतिनिधी आणि आंदोलकांत चर्चा झाली. मात्र, या चर्चेत कोणताही तोडगा निघाली नाही. ३ डिसेंबरला पुन्हा बैठक होणार आहे. मात्र, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.