जयपूर : राजस्थानच्या उदयपूरमधील एका अंध मुलांच्या शाळेतील तब्बल २४ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी याबाबतचा अहवाल समोर आला. उदयपूरमधील प्रज्ञाचश्रू अंध शाळेमध्ये ही घटना घडली.
विद्यार्थ्यांवर शाळेतच उपचार सुरू..
यानंतर कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरातील दुसऱ्या एका इमारतीमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच, संपूर्ण शाळेच्या परिसराला सॅनिटाईज करण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह मुलांवर शाळेमध्येच उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी चेतन देवडा यांनी दिली.
परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित..
जिल्हा प्रशासनाने हा परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे. तसेच परिसरात किती प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला आहे याबाबत तपासणी सुरू असल्याचेही देवडा यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकात मोठा बदल; सीबीएसईची माहिती