ETV Bharat / bharat

Cyclone Biparjoy: बिपरजॉयचा गुजरातमध्ये हाहाकार; दोन नागरिकांसह 23 जनावरांचा मृत्यू , 940 गावांमध्ये अंधार, 22 जण जखमी

गुरुवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर धडकले होते. गुजरातच्या किनारपट्टीवर धडकत लँडफॉलची क्रिया पूर्ण झाली. या आपत्तीमुळे विद्युत खांब आणि 250 च्या आसपास झाडे उन्मळून पडली आहेत.

बिपरजॉयचा गुजरातमध्ये हाहाकार
बिपरजॉयचा गुजरातमध्ये हाहाकार
author img

By

Published : Jun 16, 2023, 8:38 AM IST

Updated : Jun 16, 2023, 12:45 PM IST

गांधीनगर: बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकत लँडफॉलची क्रिया पूर्ण झाली. या लँडफॉल दरम्यान ताशी 145 किलोमीटर वेगाचे वारे वाहत असल्याने गुजरातमध्ये या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे दोन जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले आहेत. तर वीज प्रवाह खंडीत झाल्यामुळे 940 गावांमध्ये अंधार झाला आहे. या आपत्तीमुळे विद्युत खांब आणि 250 च्या आसपास झाडे उन्मळून पडली आहेत.

यावेळेत धडकलं चक्रीवादळ : गुरुवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर धडकले होते. यादरम्यान जखाऊ आणि मांडवीसह कच्छ आणि सौराष्ट्रातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस झाला. आता बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने जात आहे. आज शुक्रवारी राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. आयएमडीने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, चक्रीवादळ दुपारी अडीच वाजेपर्यंत नलियाच्या 30 किमी उत्तरेस सौराष्ट्र-कच्छ प्रदेशावर केंद्रित होते. बिपरजॉय ईशान्येकडे सरकला आणि गुजरातच्या जाखाऊ बंदराजवळ पाकिस्तानच्या किनाऱ्याला लागून असलेले सौराष्ट्र-कच्छ पार केले. दरम्यान, पुढील 4 दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता आहे.

940 गावांचा वीजपुरवठा ठप्प : मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून जीवित आणि मालमत्तेची हानी कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सुरक्षा यंत्रणा सज्ज असून नियंत्रण कक्षाकडून त्यावर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, आज शुक्रवारी वादळाची तीव्रता कमकुवत होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गुजरातचे मदत आयुक्त आलोक सिंह यांनी सांगितले की, या वादळामुळे आतापर्यंत 23 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे 524 हून अधिक झाडे आणि विजेचे खांब कोसळले आहेत. या चक्रीवादळामुळे सुमारे 940 गावांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. वादळाच्या आगमनानंतर राज्याच्या सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीवर ताशी 120 किमी वेगाने वारे वाहू लागले आणि जोरदार पाऊस झाला होता.

हेही वाचा -

  1. Cyclon Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळ सरकले राजस्थानकडे; पश्चिम राजस्थानला हाय अलर्ट, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
  2. cyclone biparjoy Landfall update : 'जखाऊ'मध्ये लँडफॉल करणार 'बिपरजॉय' चक्रीवादळ, मुंबईतील या' सहा चौपाट्यांवर मोठा बंदोबस्त

Last Updated : Jun 16, 2023, 12:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.