चंदीगड - पंजाब सरकार राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक पावले ( law and order in Punjab ) उचलत आहे. असे असतानाही राज्यात अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
एनडीपीएस प्रकरणातील 2000 हून अधिक कैदी अजूनही ( 2000 prisoners in NDPS cases ) पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहेत. पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे. सरकारने सादर केलेल्या अहवालानुसार हे 2000 कैदी पॅरोलवर ( missing 2000 parole prisoners ) गेले असले तरी अद्याप परत आलेले नाहीत. याशिवाय इतर 200 आरोपींना फरार घोषित करण्यात आले आहे. आतापर्यंत ते पंजाब पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
पंजाब सरकारचे महाधिवक्ता अनमोल रतन सिद्धू यांनी या संदर्भात मीडियाशी ( Anmol Ratan Sidhu on parishioners ) संवाद साधला. यामध्ये इतरही अनेक खुलासे झाले आहेत. ते म्हणाले की, अशी अनेक प्रकरणे 2020 सालापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.
एनडीपीएस प्रकरणातील इतर किती दोषी पॅरोलवर बाहेर गेले? पण परत आले नाहीत यावर सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारकडून उत्तर मागितले होते. त्यानंतर पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले आहे.
हेही वाचा-Beer From Urine : लघवीपासून तयार होत आहे बिअर; तुम्हाला घेऊन पहायची आहे का ?