Chicken 65 Recipe Marathi: विकेंडमध्ये काही तरी रूचकर खाण्याचा अनेकांचा प्लान असतो. सुट्टीचा दिवस असला की बऱ्याच जणांचा नॉनव्हेज खाण्याचा बेत असतो. कुणी हॉटेलमध्ये जावून वेगवेगळ्या प्रकारचं नॉनव्हेज खाण्यास पसंद करतात तर कुणी घरीच वेगवेगळ्याप्रकारचे पदार्थ तयार करतात. सर्वाधिक पसंत केलं जाणारं नॅानव्हेज आयटम म्हणून चिकन सिक्स्टिफायला ओळखलं जातं. आता तुम्ही देखील रेस्टॉरंट स्टाइल चिकन 65 घरीच तयार करू शकता. याकरिता तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. या विकेंडला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तयार करा कुरकुरीत चिकन 65.
- साहित्य
- अर्धा किलो बोनलेस चिकन ब्रेस्ट
- आल-लसूणची पेस्ट - 1 टिस्पून
- हिरव्या मिरचिचा ठेचा
- 5 टीस्पून दही
- 2 टीस्पून हळद
- 3 ते 4 टीस्पून धनेपूड
- 2 टीस्पून लाल मिरची पावडर
- कढीपत्ता
- गरम मसाला
- 2 चमचे कॉनफ्लोर
- 2 टीस्पून तांदळाचं पीठ
- कोथिंबीर
- आवश्यकतेनुसार मीठ
- कृती
- सर्वप्रथम चिकन कट करा आणि त्यास चांगलं धुवून घ्या.
- आता एका भांड्यामध्ये कट केलेलं हे चिकन घ्या. त्यात आलं-लसूणाची पेस्ट घाला. सोबतच धनेपूड, हळद, दही, लाल तिखट, गरम मसाला, कढीपत्ता, हिरव्या मरचीचा ठेचा, चवीपुरतं मीठं घालून चांगलं कोट करुन घ्या.
- आता यामध्ये घट्ट दही घाला आणि चांगल्यानं कालवू द्या.
- आता हे मिश्रण झाकून ठेवा.
- वेळ असल्यास मिश्रणाला एक रात्री मॅरीनेशनसाठी ठेवावं किंवा एक-दोन तास मॅरिनेशनसाठी ठेवलं तरी चालेल.
- मॅरिनेट झाल्यानंतर त्यात थोडं तांदळाचं पीठ आणि 2 चमचे कॉनफ्लोर टाका.
- आता गॅसवर एक कढई ठेवा त्यात तेल घाला.
- तेल गरम झाल्यानंतर त्यात चिकनचे पिस घाला. अगदी कडकडीत हाय हीटवर चिकन तळू नये.
- चिकनचे पीस चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
- आता एक दुसरी कढई द्या.
- त्यात तेल घाला. आता लसूण, दोन-चार मिरच्या तसंच कढीपत्ता घालून फोडणी द्या. आता या फोडनीत तळलेलं चिकन घाला.
- तयार आहे चिकन 65.